नायजेरियन मुलीच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वि .

 वाडिया रुग्णालयात १ वर्षाच्या एम्मा नावाच्या 

नायजेरियन मुलीच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया

यशस्वि .




रिपोर्ट : के . रवि ( दादा ) ,


मुंबई  : संपूर्ण जगात  नवजात बालकांमध्ये जन्मताच हृदयरोग फक्त एक टक्के आढळतो, त्यापैकी 70 टक्के प्रकरणे सोप्या आणि एका वेगळया हृदय शस्त्रक्रियेद्वारे सोडवली जातात, परंतु जगाच्या पाठीवर वसलेल्या  नायजेरियामध्ये दरवर्षी जन्माला येणाऱ्या 7 दशलक्ष बालकांपैकी सुमारे 56 हजार या विकाराने ग्रस्त असतात  , 


अशा बालकांना जगभरासह  भारता देशांमध्ये उपचारासाठी पाठवले जाते, कारण नायजेरियात ही सुविधा नाही. अशाच एका नायजेरियन मुलीवर 27 जुलै  2021 रोजी मुंबईच्या प्रसिद्ध अशा  परेल येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.  डॉ.विश्वास पांडा यांनी केली.


रोटरी क्लब ऑफ मुंबई तर्फे या शस्त्रक्रियेचा खर्च व्यवस्थापित करण्यासाठी निधी गोळा करण्यात आला. सुप्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्ते आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई एसेसचे सदस्य सुमन आर अग्रवाल ह्यावर म्हणाले की, एम्मा नावाच्या 1 वर्षाच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे .

या रुग्णालयात नायजेरियन मुलाची अशी दुसरी शस्त्रक्रिया इथल्या डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेदरम्यान, शस्त्रक्रियेसाठी नायजेरियाहून येथे आलेल्या एम्माची आई सुद्धा तिच्या सोबत होती . 

Post a Comment

0 Comments