जुन्या पिढीतील काॅंग्रेसचे निष्ठावंत,निरलस आणि तत्ववादी व्यक्तिमत्त्वाच्या समन्वयी युगाचा आणि एका पर्वाचा अस्त.
एडगाव या गावच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रातील अग्रणी माजी सरपंच पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांचे दुःख द निधन.
||•|| 87 व्या वर्षी घेतला
अखेरचा श्वास
_______________________________________
मुंबई ||•
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वैभववाडी तालुक्यातील ज्येष्ठ दिग्गज नेते, आणि एडगाव या गावच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, माजी सरपंच पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांचे बुधवार दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अल्पशा आजारामुळे अखेरचा श्वास घेतला आहे.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे एक निरलस आणि तत्ववादी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल.
त्यांच्या निधनामुळे अवघा तालुका हळहळला असून त्यांच्या रूपानं जुन्या पिढीतील समन्वयी युगाचा आणि एका पर्वाचा अस्त झाला आहे.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांचा जन्म 1935 साली झाला. 1965 मध्ये एडगाव या गावचे ते पहिल्यांदा उपसरपंच झाले. 1970 मध्ये एडगाव गावच्या सरपंच पदी ते बिनविरोध विराजमान झाले. पुढे 1970 ते 1995 ह्या सुमारे 25 वर्षाचा प्रदिर्घ काळ एडगाव गावचे बिनविरोध सरपंच म्हणून पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांनी दैदिप्यमान कामगिरी केली.
एडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांची सरपंच पदाची कारकीर्द गौरवशाली,आणि ऐतिहासिक अशीच ठरली आहे.
वैभववाडी तालुक्याच्या निर्मितीमध्ये ज्या दिग्गज नेत्यांचे योगदान होते त्यामध्ये यशवंतराव रावराणे, आबासाहेब रावराणे,के.गो.रावराणे, मानाजीराव गुरव,डॉं आप्पा साहेब पाटील, श्रीधरराव खानविलकर, आदी नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून वैभववाडी तालुक्याच्या निर्मितीसाठी आणि नवनिर्मित वैभववाडी तालुक्याच्या विकासासाठी पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे हे वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे संस्थापक सदस्य होते. तसेच ते वैभववाडी तालुका ग्रृह तारण संस्थेचे विद्यमान चेअरमन म्हणूनही कार्यरत होते.
रवळनाथ विकास सोसायटीचे ते चेअरमन ही होते.
विशेष म्हणजे 1965 च्या दशकात पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांनी तळकोकणात सर्वप्रथम सामूहिक शेतीची संकल्पना राबवली होती.
पन्हाळा,बावडा,वैभववाडी,विधानसभेचे भाग्यविधाते, तत्कालीन आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा), ज्येष्ठ नेते ए. पी .सावंत, ज्येष्ठ नेते डी .वाय .पाटील, तत्कालीन खासदार बाळासाहेब माने ,यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांची ओळख होती.
अत्यंत साधेपणा,
साधे राहणीमान व,सत्तशील व्यक्तिमत्त्वाचे पितृतुल्य
पुंडलिकराव रावराणे यांनी समाज कार्यात वावरताना एक स्वतःची अशी आदर्श जीवन शैली अखेरपर्यंत अंगीकारली होती.
स्वकर्तृत्वावर वेगळी उंची गाठणारे मोजक्या नेत्यांपैकी पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे हे एक होते. त्यांच्या विषयी सर्वच स्तरावर आत्मीयतेची भावना होती.
चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांनी समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते.
आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे आपल्या विचारांशी आणि तत्वांशी ठाम राहिले. विचारांच्या एकनिष्ठतेचे सुंदर उदाहरण म्हणजे पितृतुल्य पुंडलिक रावराणे होय.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे निरलस, सत्तशील आणि तत्ववादी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. उत्तुंग व्यक्तिमत्व ,सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांचे भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे तसेच सुबोध रावराणे हे दोन सुपुत्र आहेत तसेच मुंबईत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वंदना तथा नेहा सावंत रावराणे या त्यांच्या कन्या आहेत.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांच्या पश्चात त्यांची पत्नी,सुना, जावई,नातवंडे,असा मोठा परिवार आहे.
पितृतुल्य कुंडलिकराव रावराणे व्रतस्थ व्यक्तिमत्व ,वैभववाडी तालुक्याने गमावले आहे. जुन्या पिढीतील इतिहासाचा साक्षीदार गमावला आहे. त्यांच्या जाण्याने वैभववाडी तालुक्याच्या सामाजिक,सहकार,राजकीय ,जगताची अपरिमित अशी हानी झाली आहे.
पितृतुल्य पुंडलिकराव रावराणे यांच्या स्मृतीस
विनम्रभावे अभिवादन ...!
भावपूर्ण श्रद्धांजली ...!!
-------------------------------------------------------------
||•|| तानाजी कांबळे
7507966260
--------------------------------------------------------------
*||•|| महाराष्ट्र संध्या, युट्यूब चॅनेल.*
आपल्या हक्काचं,आपलं चॅनेल.
*||•|| महाराष्ट्र संध्या,न्यूज पोर्टल.*
निप:क्ष,निर्भीड,लोक माध्यम.
*||•|| महाराष्ट्र संध्या*
शासनमान्य यादीवरील साप्ताहिक,
या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, शैक्षणिक,क्रीडा,सहकार, कामगार,आदी विविध क्षेत्रातील घडामोडींचा अचुक वेध घेत.
अन्याय,अत्याचार,आणि भ्रष्टाचार तसेच दैनंदिन ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या माध्यमातून आम्ही आपल्या पर्यंत पोहोचत आहोत. या माध्यमांना कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब,करा.तसेच जाहिराती व बातम्यांसाठी अवश्य संपर्क करा.
*महाराष्ट्र संध्या.*
डीजीटल मिडीया समुह
_____________________________________
समुह संपादक
*||•तानाजी शांताराम कांबळे*
*||•7507966260*
0 Comments