जात लपव्या "जयभीम" न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांच्या समर्थानात आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:- डॉ. राजन माकणीकर यांची रोखठोक भूमिका.

जात लपव्या "जयभीम" न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांच्या समर्थानात आंबेडकरी समाजाने जाऊ नये.:-  डॉ. राजन माकणीकर यांची रोखठोक भूमिका.

*मुंबई दि (प्रतिनिधी) 
बौद्ध असूनही जातं लपवून जयभीम न म्हणणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या संकट समयी त्याच्या समर्थनात आंबेडकरी समाजाने जाऊ नये. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.*


बौद्ध असूनही जयभीम न घालणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वप्रथम झोडपून काढणार असल्याचेही त्यांनी बोलले असून, जातीच्या नावा वर नोकरी मिळवून धनदांडगे होऊन बापाला विसरून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना खऱ्या आंबेडकरवादी जनतेंनी कुठलीच मदत करू नये.

NCB मुंबई संचालक समीर वानखेडे यांनी कधीच आंबेडकरी समाजाचा असल्याचा अभिमान बाळगला नाही तर उलट ते आज पर्यंत स्वतःला हिंदू म्हणवून घेत होते, मात्र आता संकट उभा राहिल्याने आम्ही आंबेडकरवादी आहोत, माझं प्रमाणपत्र महार जातीच आहे आम्ही बौद्ध आहोत असे बोल तोंडातून निघत आहेत.

अश्या मतलबी अधिकर्यांपासून सतर्क राहणे नित्याचे असून अश्या दोनतोंडी अधिकार्यांपासून आंबेडकर प्रेमींना सावध राहणे अति महत्वाचे ठरले आहे.

डॉ. राजन माकणीकर पुढे असे म्हणाले की अश्या अधिकाऱ्यांनी एक तर जात आणि धर्म सोडावा व खुशाल टाळ कुटत बसावे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन नोकरि प्राप्त करायची आणि नंतर जात लपवायची असेल तर माझ्यासारख्या पासून सावध राहा कधी आणि कोणत्या रुपात आंबेडकरी पँथर तुमचे मुस्काट फोडतील हे समजणार नाही असाही गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.



Post a Comment

0 Comments