वंचित बहुजन आघाडी च्या मानखुर्द शिवाजी नगर तालुका महासचिवपदी एडवोकेट दिपक तांबे तर सचिवपदी सचित म्हात्रे यांची नियुक्ती
||• मुंबई प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या मानखुर्द शिवाजीनगर तालुका महासचिवपदी मुंबई हायकोर्टाचे वकील एडवोकेट दीपक तांबे यांची ,तसेच तालुका सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते सचित म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मान्यतेने दिनांक 24 जून 2021 रोजी एडवोकेट दीपक तांबे आणि सचित म्हात्रे यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
तालुकाध्यक्ष सलीम सिद्दिकी यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र एडवोकेट दीपक तांबे आणि सचिन मात्र यांना दिली आहेत.
सचित म्हात्रे हे भीमसेवक संस्था गोवंडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी भारतीय बौद्ध महासभा राजापूर तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस शाखा तेरवण, माजी खजिनदार भीम सेवक संघ टाटा नगर गोवंडी, सन्मित्र पतसंस्था आदी संस्थांवर काम केले आहे.
एडवोकेट दीपक तांबे आणि सचिन मात्रे हे समता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेवर अनुक्रमे रायगड जिल्हा अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्षे काम करीत आहेत.
एडवोकेट दिपक तांबे यांची वंचित बहुन आघाडी मानखुर्द गोवंडी तालुका महासचिवपदी तर सचित म्हात्रे यांची तालुका सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल समता प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष तानाजी कांबळे व राज्य सरचिटणीस अभय भाऊ पवार यांनी अभिनंदन केले आहे.
एडवोकेट दिपक तांबे व सचित म्हात्रे यांचा लोकसंपर्क दांडगा असून वंचित बहुजन आघाडी च्या महासचिवपदी दीपक तांबे यांची तर तालुका सचिव पदी सचित म्हात्रे यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





0 Comments