यवतमाळ दि. 22:
जिल्ह्यात 19 जून पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिका करिता कोविड लसीकरण निवडक 10 ठिकाणी सुरु करण्यात आले होते, आता शासन स्तरावरून प्राप्त सुधारीत सूचनेनुसार यवतमाळ जिल्यात आज पासून सर्व ठिकाणी 18 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविड ची लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी येतानी नागरिकानी आपले ओळख पत्र दाखवून ऑनस्पॉट किवा आधीच कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. तसेच 45 वयोगटावरील नागरिकाना करीता पुर्वी प्रमाणेच लसीकेंद्र सुरू राहणार असून सद्या जिल्ह्यात 107 ठिकाणी लसीकरण सुरू आहेत.
जिल्ह्याला काल 5000 कोवाक्सिन तर 32000 कोविशिल्ड लस प्राप्त झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 445090 कोविशिल्ड व 89730 कोवाक्सिन लस प्राप्त झाली आहे. 18 ते45 वयोगटातील जवळपास 35000 नागरिकांना लस देण्यात आली असून एकूण 507867 नागरिकांचे लसीकरण आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे.
गावा-गावात लसीकरण राबविण्यात येत आहे. गाव स्तरीय समितीने आपले गावात 18 वर्षे वरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे करिता प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आह. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.


0 Comments