*ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती व समस्या संदर्भात राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीमध्ये विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा.क्र. 188 चे अध्यक्ष जयवंतजी तांबे यांची अभिनंदनीय निवड*
*मुंबई | तानाजी कांबळे*
समाजभूषण | ज्येष्ठ पत्रकार
ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती व समस्या संदर्भात राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीमध्ये विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.188 चे शाखा अध्यक्ष जयवंतजी तांबे यांची अभिनंदन निवड झाली आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी दिनांक 31 जुलै 2025 रोजी मंत्री ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमीबद्दलची समस्या आणि उपाययोजना या संदर्भात राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत राज्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमीच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमी बद्दलची सद्यस्थिती व समस्या या संदर्भात राज्यस्तरावर अभ्यास समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार 10 आक्टो 2025 रोजी राज्य शासनाने एका जीआर नुसार घोषणा केली आहे. शासन निर्णय ,महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक विकास 20 - 25,/प्र.क..214/यो-6
दिनांक 10 आक्टो 2025
गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये एकूण पंधरा मान्यवरांचा समावेश आहे. त्यामध्ये विवेक विचार मंचेचे मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र
188 चे अध्यक्ष जयवंत जी तांबे यांचा समावेश झाला आहे.
राज्यस्तरीय अभ्यास समितीमध्ये मंत्री ग्राम विकास हे अध्यक्ष असून अभिमन्यू पवार विधानसभा सदस्य, देवेंद्र कोठे विधानसभा सदस्य, अमित गोरखे विधानसभा सदस्य,अप्पर आयुक्त विकास, विभागीय आयुक्त कार्यालय कोकण सदस्य सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य,गटविकास अधिकारी पंचायत समिती सदस्य, मनीष मेश्राम नागपूर अशासकीय सदस्य,अशोक राणे बुलढाणा अशासकीय सदस्य, ऋषिकेश सकनुर परभणी अशासकीय सदस्य, एडवोकेट गुरुप्रीत सिंग हलूवालिया जळगाव अशासकीय सदस्य, श्रीमती अश्विनी चव्हाण सोलापूर शासकीय सदस्य, सामाजिक वनीकरण क्षेत्रातील एक सदस्य,अशा प्रकारची ग्रामीण क्षेत्रातील स्मशानभूमी बाबतची सद्यस्थिती व समस्या या संदर्भात राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्यात आली असून विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.188 चे अध्यक्ष जयवंतजी तांबे यांची या समितीमध्ये अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे.या निवडी बद्दल जयवंतजी तांबे यांचेवर अभिनंदनचा वर्षा होत आहे.
0 Comments