राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तानाजी कांबळे यांचा कल्याणमध्ये रेल्वेने माजी अधिकारी श्याम तुळवे यांनी केला सत्कार.!

राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तानाजी कांबळे यांचा  कल्याणमध्ये रेल्वेने माजी अधिकारी श्याम तुळवे यांनी केला सत्कार.!

कल्याण प्रतिनिधी 

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांच्या 25 वर्ष अविरत कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे.

तानाजी यांना मिळालेल्या या सर्वोच्च बहुमानाबद्दल कल्याणमध्ये रेल्वेने माजी अधिकारी श्याम तुळवे यांनी आपल्या निवासस्थानी ब़लावून सत्कार केला.यावेळी ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ वानखडे  उपस्थित होते.
बुधवार 25 जून 2025 रोजी कल्याण येथे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा निळी शाल पुष्पगुच्छ देऊन रेल्वेचे माजी अधिकारी श्याम तुळवे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या वतीने शानदार सत्कार केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि चळवळीला प्रमान माणुन तानाजी कांबळे हे 25 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहेत.या क्षेत्रातील त्या़चे योगदान महत्त्वाचे आहे..

ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यसरकारने दखल घेवून त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला .ही आनंदाची बाब आहे.एका सच्चा आणि प्रामाणिक भीमसैनिकाच्या कार्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया  रेल्वेचे माजी अधिकारी श्याम तुळवे यांनी सत्कारानंतर व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments