धार्मिक तेढ निर्माण करून सोहार्दतेला सुरंग लावण्याचा प्रयत्न : जयदीप कवाडे



धार्मिक तेढ निर्माण करून सोहार्दतेला सुरंग लावण्याचा प्रयत्न : जयदीप कवाडे

 नागपुरातील हिंसाचाराचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे तिव्र निषेध 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रगाढ बुद्धिमत्ता व युद्धकौशल्याच्या जोरावर स्वराज्य निर्मिती करून विश्वात त्यांची ख्याती आहे. त्यांच्याच पाऊलशात नवीन चेतना निर्माण केली. प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवणाऱ्या छत्रपतींच्या राज्यात आज जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहे. सोमवारी नागपुरात औंरगजेबच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर दो समुदायात झालेल्या वादाचे रुपांतर दंगलीत झाले. यात निष्पाप नागरिकांसह पोलिस कर्मचाऱ्यांवरही हिंसाचार करण्यात आले. याशिवाय स्थानिकांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. राजकीय हेतूने राज्याचे वातावरण दुषित करण्याचा घाट होत आहे. धार्मिक तेढ निर्माण करून सोहार्दतेला सुरंग लावण्याचा प्रयत्न राज्यात होत असल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी केला. जयदीप कवाडे यांनी दंगल घडविणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आवाहन सरकारला पत्राद्वारे केले आहे. 
पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सोमवारी नागपुरात झालेल्या हिंसाचारातून याची प्रचिती होत आहे. प्रत्यक्षात काल झालेली घटना अतिशय निंदनीय असून याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तिव्र निषेध करत असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले. धार्मिक तेढ निर्माण करून राज्याच्या सोहार्दतेला सुरूंग लावण्याचा कुटील डाव आज विरोधी पक्ष करीत आहे. कोणतेही मुद्दे नसताना नागपुरात दंगली घडवून पाहायला मिळत आहे.  दंगलच घडवून हिंसाचारचे लोन पसरविण्याचा प्रयत्न दगडफेक कारणाऱ्यानी सोमवारी नागपुरात आपल्याला पाहायला मिळाला. यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सोसावे लागले. अश्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने दक्षता बाळगण्याची गरज असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.

                                                                                                          धन्यवाद                
          प्रसिद्धी प्रमुख
        कपिल लिंगायत
    संघटक-महाराष्ट्र प्रदेश 
  पीपल्स रिपब्लिकन पार्टी
         9096489589

Post a Comment

0 Comments