महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी,गायक,कोकणचे सुपुत्र,
आदरणीय नाथाजी जाधव जिवेत् शरद: शतम्
---------------------------------------------------------------
भारतीय संविधानाचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, महामानव, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक,धार्मिक व राजकीय विचाराने प्रेरित झालेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, गायक, कोकणचे सुपुत्र आदरणीय नाथाजी जाधव यांचे 68 व्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक अभिष्टचिंतन! व त्यांच्या उज्वल वाटचालीस लक्ष लक्ष क्रांतिकारी शुभेच्छा !! 🌻🌹🌸🏵️
_______________________________________
🏵️ तानाजी कांबळे
7507966260
ज्येष्ठ पत्रकार, समुह संपादक
¶¶ महाराष्ट्र संध्या न्यूज पोर्टल.
¶¶ महाराष्ट्र संध्या युट्युब चॅनेल.
---------------------------------------------------------------
महाराष्ट्राचे सुप्रसिद्धआदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वारगाव या त्यांच्या मूळ गावी झाला. कवि गायक नाथाजी जाधव यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच पूर्ण केल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. मुंबईतील ताडदेव या विभागात त्यांनी आपले बस्तान बसविले. ताडदेव च्या झोपडपट्टी विभागात स्थिरस्थावर होताच आदरणीय कवी गायक नाथाजी जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्याला सुरुवात केली.
ताडदेव परिसरातील बौद्ध सेवा मंडळाना एकत्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 86 व्या जयंती महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. 15 एप्रिल 1977 रोजी ताडदेव विभागात प्रथम
बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे या जयंती सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर. आवर्जून उपस्थित होते. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्याचे भाग्य आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांना लाभले. या कार्यक्रमाच्या आयोजना मध्ये कवी,गायक नाथाजी जाधव यांचा सिंहाचा वाटा होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.माझ्या नेत्यांची दहा भाषणे आणि माझ्या कलावंतांचे एक गाणं 10 च्या बरोबर आहे. बाबासाहेबांच्या या उद्घघोषाचा आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांच्या मनावर खोलवर ठसा उमटला होता. आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांच्यामध्ये उपजत कला होती. आंबेडकरी चळवळी मध्ये त्यांच्या गीतांचे मोठे योगदान आहे. कवी, गायक कलावंत, यांना बाबासाहेबांनी मानेमोठे प्रोत्साहन दिले आणि पुढे आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांनी खेडोपाडी, गल्ली,बोळात, आंबेडकरी विचार प्रामाणिकपणे पोहोचविण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, कव्वालीचा बादशाहा आदरणीय गोविंद म्हशीलकर, गोपीचंद रुके, राजस जाधव, नवनीत खरे, गौरीकुमार साळुंके,यमराज पंडित, ज्ञानेश पुणेकर, अशा नामवंत कलावंतांचा आदरणीय कवि,गायक नाथाजी जाधव यांना सहवास लाभला.
तुला याड लागलं मुंबई पाहायचं! पण माझं वांद झालं मुंबईत राहायचं !!
माझे लाडके सरु नको विचार करु! तुला धाडीनं मी पत्र यायचं!!
--------+-------------
वरीस भागलं, दुसरं लागलं,!
तरी संप मिटना गिरणीचा !!
ना दागिना उरला घरणीचा हो !
पस्तावा होतोय करणीचा !!
----------+------------
डुबवलास गे माका,आता ऐक खाॅलाॅन कान!
दारूडो ह्यो नवरो, बघाॅन केलास कन्यादान!!
--------------+----------
दिवाळीच्या सणातच दिवाळ काढलं !
बायकोने वर चढवलं अन खाली पाडलं!!
---------------+-----------
आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांनी अशा प्रकारची समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी स्वरचित विनोदी आणि सामाजिक गीते लिहिली आणि समाजाचे प्रबोधन केले आहे.
-----------------+-----------
आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांना राजदत्त तांबे, मोहन मोरे, सोनू कुसुरकर, बुद्धिवान घाडगे, विवेक कांबळे,झुंजार सकपाळ, चंद्रमणी घाडगे, अशा अनेक कलावंतांनी सावली सारखी साथ दिली.प्रोत्साहण दिले.
आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांची गीते स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे, छाया मोरे, मीनाक्षी थोरात, निशा भगत, विजय सरतापे, राहुल शिंदे, सुरेश शिंदे, मधुकर जाधव,प्रकाश आजविलकर, विनोद धोत्रे, दिनेश हेरबेंडे, विजय काशीद, महेश गमरे, राजाराम साळवी, सिताराम गायकवाड, दिलराज पवार, प्रकाश सावंत, आधी नामवंत गायकांनी गायिली आहेत.
जन उद्धारक, बहुजनांचा नायक, धम्मक्रांती, धम्मचक्र,क्रांतिकारी भिम पर्व, बसला दिल्लीच्या गादीवर, पोरी तू ग जय भीम वाली, आदी आदरणीय कवि,गायक नाथाजी जाधव यांच्या सिडीज् व कॅसेट तसेच गाण्यांची पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.
महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी विविध स्वरूपाचे पुरस्कार देऊन आदरणीय कवी,गायक नाथाजी जाधव यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे.
आदरणीय कवी गायक नाथाजी जाधव यांच्या प्रभावशाली कार्यास महाराष्ट्र संध्या न्यूज पोर्टल, महाराष्ट्र संध्या युट्युब चॅनेल, आणि साप्ताहिक महाराष्ट्र संध्या, परिवाराला जोडल्या गेलेल्या सुमारे 90,000 हजार पेक्षा जास्त दर्शकांच्या वतीने आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी,गायक आणि कोकणचे सुपुत्र आदरणीय नाथाजी जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हार्दिक अभिष्टचिंतन !! करतो.
उत्तम आरोग्यासाठी,उदंड आयुष्यासाठी आणि
उज्ज्वल वाटचालीसाठी आदरणीय कवि,गायक नाथाजी जाधव यांना आमच्या क्रांतिकारी शुभेच्छा!
----------------------------------------
तानाजी कांबळे
समुह संपादक
7507966260
महाराष्ट्र संध्या, न्यूज पोर्टल.
महाराष्ट्र संध्या, युट्युब चॅनेल.
महाराष्ट्र संध्या, शासनमान्य यादीवरील साप्ताहिक
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶
🏵️ नाथाजी जाधव यांच्या 14 जानेवारी
वाढदिवसानिमित्त
🏵️ जनिकुमार कांबळे यांनीही दिल्या शुभेच्छा!
---------------------------------------------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजीक धार्मिक राजकीय विचाराने, झपाटलेला कोकणातील कवि आद. नाथा जाधव -वारगावकर.यांचा आज ६८ वा वाढ दिवस आहे .
मनुष्य किती वर्षे जगला याला महत्व नसुन ,तो कसा जगला याला महत्व दिले जाते. या गोष्टीला अनन्य महत्व आहे. अनेक क्षेत्रातील कलावंत साहित्यिक पाहीले व काही पुस्तकातही वाचले आहेत .बरेच जन व्यसनाधीन होऊन ,आपआपली कला प्रदर्शित करीत होते. त्यातून सुसंसक्रुत पीढी घडत नव्हती .उलट बरेच लोक बिघडत होते. हे जवळुन पाहीले आहे .समाजाला जाग्रति करण्यासाठी १९७४-७५मधये नाथा जाधवने लिहीलेले ,दारूची बाटली,नावाचे गीत व दिवाळीच्या सणात मिळविलेला पैसा ,डोके न वापरता अव्यवहारी बनून,बायको मुलांच्या हव्यासापायी कसे वाकले जातो .आपण काय काय करून बसतो. तो प्रसंग -
दिवाळीच्या सणातच दिवाळ काल !!
बायकोने वर चढवल अन खाली पाडल !!
हे स्वरचित गीत समाजाच्या डोळ्यात खरंच अंजन घालत होते.
लोकांनी धर्मांतर केले .बौद्ध धम्म स्विकारला. परंतू धम्मात काय करावे ?हेच कुणाला काही कळत नव्हतें. बौद्ध धम्म किती श्रेष्ठ महान आहे. ते गीत गायनातून ,मुंबईतील बौद्ध वस्तीवर ,रत्नागिरी कोकण भागात, गाव खेडयात जाऊन सांगीत होते. ६०-७० च्या दशकात बुद्ध भिम जयंती, नामकरण विधी सोहळा, जलदान विधी अशा कार्यक्रमात गायन पार्टी जोरात चालू असायच्या. छाती फुटेतोवर बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर लोकांना ऐकवत होते .
सोनु कुसूरकर,भिमानंद, झुंजार सकपाळ,राजदत तांबे,प्रकाश गोवळकर,विवेक कांबळे,रामचंद्र सावंत, मोहन मोरे,इत्यादी-एकापेक्षा एक,सुंदर शब्दांची गुंफण ,गुंफविणारा ,कवि गायक कलावंतांना साथ सोबत करणारा ,निगर्विषठ कवि म्हणजे-
नाथा जाधव होय. ते कवि आहेतच परंतू ते हार्मोनियम वादक ही आहेत.
कोकणातील कवि गायक कलावंतांचा इतिहास लिहायचा झाल्यास,ज्ञात-अ ज्ञात कवि गायकांची खुप मोठी नावाची यादी होईल .या यादीत नाथा जाधवचे नाव कवि म्हणून अजरामर राहील. अशा या निर्व्यसनी निर्विकार, प्रबोधनाचा बाज सांभाळुन ,आज ही त्यांच्या लेखनीतून सुंदर गाणी लिहीली जात आहेत .कोकणातील -सिंधुदुर्गातील सर्व कलावंतांच्या वतीने ,नाथा जाधव वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
🏵️ जनिकुमार कांबळे
कवि,गायक,गितकार,शाहिर
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶
तानाजी कांबळे,समुह संपादक,7507966260
¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶

1 Comments
Jay bhim namo buddhay
ReplyDelete