ब्राह्मणांचे षडयंत्र भारतातील बौद्ध हाणुन पाडतील .! पँथर नेते विवेक गोविंदराव पवार यांचा इशारा.!

ब्राह्मणांचे षडयंत्र भारतातील बौद्ध हाणुन पाडतील .! पँथर नेते विवेक गोविंदराव पवार यांचा इशारा.!
::::::::::::::::::::::::::::::::
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी | सांताक्रुज भीमवाडा ते पोलीस ठाणे दरम्यान रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन |

मुंबई  | प्रतिनिधी 
बिहार राज्यातील बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी महाविहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. 1949 चा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा. आणि तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करून बौद्धांच्या ताब्यात व्यवस्थापन देण्यात यावे अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस पॅंथर नेते भाई विवेक गोविंदराव पवार यांनी केले आहे.
सांताक्रुज भीमवाडा येथून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमा, पंचशील ध्वज, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, हातात विविध मागण्यांचे फलक धरून शेकडो स्त्रिया, पुरुष, या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलन करताना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस पॅंथरनेते भाई विवेक गोविंदराव पवार पुढे म्हणाले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परदेशात गेल्यानंतर आमचा देश बुद्धांचा देश असल्याचे सांगतात, ते बौद्धांचे मित्र समजतात, त्याने द्या राजाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आदेश देऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी मागणी ही पॅंथरनेते विवेक गोविंदराव पवार यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले महाबोधी महाविहार मुक्ते आंदोलन आता केवळ मुंबई महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर ते पूर्ण विश्वामध्ये आता पसरले जात आहे. पुरातत्त्व असलेले महाबोधी महाविहार ब्राह्मणांनी आपल्या हातात ठेवून एक षडयंत्र रचलेले आहे. ब्राह्मणांचे हे षडयंत्र भारतातील बौद्ध आणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही त्यानंतर नेते विवेक गोविंदराव पवार यांनी दिला आहे. 

यावेळी सांताक्रुज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगाडे यांना पवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments