भीम स्तुती आहे .स्रोत्र नाही.
प्रार्थनेचा दर्जा नसून बाबासाहेबांचे रोज स्मरण करणे म्हणजे त्यांनी केलेल्या उपकारांची परतफेड होय.
हजारो वर्षे भारत भुमीतुन लुप्त झालेला बौद्ध धम्म, त्या धम्माचा करता करविता भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी आम्हांला बाबासाहेबानी दाखविला,त्यांचे गुणगान गायचे नाही तर कोणाचे गावेत?
भव्य म्हणजे मोठा मोठे मोठी,
दिव्य म्हणजे दिवा,प्रकाशमान ,डोळयांना सुखविणारा ,कधी पाहीला नाही आज पाहीला ! अपुर्व,अदभूत,
स्वर्गिय ,दैवी असा त्याचा अर्थ काढु नये. मला तर काल्पनीक वाटत नाही.
२)साधु म्हणजे संन्यासी, घरदार प्रपंच सोडुन ,परित्याग करणारा,
वरदान म्हणजे आशिर्वाद, चांगले शुभाषीत,
सुभेदार रामजीबाबांची बदली, मध्यप्रदेशात इंदूर महू गावात झाली होती. त्यावेळी तिथल्या नदीवर, काही महीला सोबत ,भिमाबाई कपडे धुण्यासाठी गेली होती. तिथे नदीच्या किनारी वरच्या भागात आंघोळ करायला, रामजीबांबाचे थोरले बंधू संन्यासी,तांडयात होजोशीत्यांनी खालच्या बाजूला, कपडे धुत असणाऱ्या महिलांमध्ये महाराष्ट्रीयन पोशाखात आणि मराठी कोकणी भाषा बोलणारी एकच महिला होती.
तीच्या जवळ जाऊन तीची चौकशी केली. व नेहमीच्या शिरसतयाप्रमाणे ,
भिमाबाईला तो साधु असा म्हणाला,
तुझे कल्याण होईल! तुझ्या पोटी जन्माला येणारे बाळ, आपल्या कुळाचा,समाजाचा उद्धार करेल!
आशिर्वाद देणारे, रामजीबांबाचे थोरले बंधु संन्यासी साधु होते. त्या साधु चे वरदान आहे.
हे नाकारत असाल तर डॉ.बाबासाहेबांचा चरित्र ग्रंथ नाकारावा लागेल़
३)आद्य म्हणजे प्रथम,कुल म्हणजे घराने, भुषण म्हणजे सुंदर,गौरव,
सकपाळ घराण्यात यापुर्वी कधीच गौरव करण्या सारखा किर्तीमान पुरूष जन्मला नाही. तु आमच्या घराण्याचा गौरव आहेस.
४)भक्त म्हणजे पाईक शिष्य अनुकरणीय.
पाईक शिष्यांचा उदधार करणारा.
५) भारती म्हणजे भारता,भारतीचा अर्थ सरस्वती हा ब्राम्हणी शब्द आणू नये.
डॉ. केतकर आणि तर्कतीर्थ -सक्शमण शास्त्री जोशी यांनी लिहीलेला शब्दकोश ग्रंथ वाचावा. मराठी शब्दांचा एका शब्दांचा समानार्थी पाच पचनास अर्थ सापडतात.
६)पहीला स्वजनांचा उदधार करणे इथे इतरांचा उलेख नाही. म्हणून अनर्थ काढु नये.
बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की, मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही, तर स्वताला गोळी घालुन जिवन संपवेन!
इथे स्वजनांचा उद्धार शब्द योग्य वाटतो.
७)रौद्ररूपा बाबासाहेबांना उपमा दिली आहे.असा कोणी गैरअर्थ काढताना हे समजून घ्या की,
गोलमेज परिषद आटपून , बाबासाहेब आंबेडकर भारतात आले,आणि पुढे गांधी -आंबेडकर वाद विकोपास गेल्याचे सर्वांना माहीत आहे.
गांधींचे। आमरण उपोषण, त्यानंतरचा पुणे करार ,हे तत्कालीन रौद्ररूप होते?की शांतरूप होते?जरा तो प्रसंग आठवा.
भगवान बुदधांचया गाथां मध्ये बरयाच ठिकाणी अंधश्रध्दा युक्त देवतांसारखे शब्द आले आहेत ती भेसळ आपण मानतो .
बंधुनो, चिकीत्सा केली पाहीजे. करू नये या मताचा मी नाही.
भारतीय बौद्ध महासभेची १९६८ते आज पर्यत एकुण ७ अधिवेषने झाली आहेत .यावर खुप चर्चा करून, भिम स्तुती समाविष्ट करण्यात आली आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत.
आता ज्याना कोणाला बदल करायचा असेल , त्याना मुक्त स्वातंत्र्य आहे.
जशी द्रुष्टी तशी स्रष्टी!
आपल्या समाजात कशाचा कोण कसाअर्थ लावेल ?
हेच बघाना, माझ्याकडे एक विलास खरात यांचे पुस्तक आहे .त्याचे नाव
गौतम बुद्ध, हे हिंसावादी होते.
हे पुस्तक वाचले आणि फेकुन द्यावे असे वाटले. परंतु ते संदर्भासाठी जपुन ठेवले आहे.
"""""""”""''''"""""""""""""'''"""""""""""""”"
जनीकुमार कांबळे
कवि व गायक बौदधाचार्य -माजी श्रामणेर
केंद्रिय शिक्षक, पर्यटन विभाग सचिव
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदूर्ग.
माजी अध्यक्ष
मो.नं. ९०७५२७५०६४
"""""""''"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
तानाजी कांबळे : मुख्य संपादक,
महाराष्ट्र संध्या ,न्यूज पोर्टल
निर्भिड निपक्ष लोकमाध्यम
संपर्क : 7507966260
0 Comments