रविवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद

 रविवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद



डोंबिवली  ( शंकर जाधव ) 

    कल्याण डोंबिवलीत  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  रविवार २८ तारखेला  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद राहणार  असल्याचे  व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी  सांगितले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज सुमारे १००  फळे, भाजी,फुले, कांदे-बटाटा यांच्या गाड्यांची आवक जावक होत असते. बाजार समिती मधील सर्व  व्यापारी, दुकानदार आणि कामगार महापालिकेच्या पी १ आणि पी २ च्या नियमाचे पालन करतात. काही दिवसांपासून कल्याण- डोंबिवली महानगरपालिका हद्दीत  कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने रविवारी २८ तारखेपासून   कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीचे अध्यक्ष कपिल थळे यांनी सर्वानुमते घेतला आहे.याच दरम्यान मार्केटची साफसफाई करून सॅनिटायझर ही करण्यात येणार आहे. तसेच पुढील येणारे सर्व रविवारी देखील मार्केट बंद ठेवणार असल्याचे ही पोखरकर यांनी सांगितले.

२७ मार्च २०२१ कोरोना रुग्ण 

कोरोनाचे नव्याने आढळले ८२९  रूग्ण  ५८६ रुग्ण बरे 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे शनिवार २७ तारखेला  नव्याने  ८२९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४  तासात  ५८६  रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर कोरोनामुळे  तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७  हजार ३४१ आहे. तर आतार्पयत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६६  हजार ९०९ आहे.


Post a Comment

0 Comments