महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचा अपप्रचार करणाऱ्यां विरोधात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे
--------------------------------------------
महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याचे अभ्यासक
ॲड.प्रदिप गावडे यांचे प्रतिपादन
मुंबई | प्रतिनिधी
जे लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान नाकारत आहेत. समाजात द्वेष,हिंसा, अराजकता, पसरवीत आहेत. अशा माओवादी, नक्षली, संघटनांमध्ये काम करणाऱ्यां संघटनांवर आणि लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला जन सुरक्षा कायदा काम करणार आहे..जन सुरक्षा कायद्यान्वये कुणालाही अटक करता येते, असा कायदा भारतात कुठेही नाही असा खोटा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे.अशावेळी कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे. असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि या कायद्याचे गाढे अभ्यासक ॲड.प्रदीप गावडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा विपर्यास आणि वास्तव या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि या कायद्याचे गाढे अभ्यासक ॲड.प्रदीप गावडे यांच्या विषेश व्याख्यानाचे आयोजन नालंदा विधी महाविद्यालय, गोराई बोरिवली मुंबई येथे 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
विचार पिठावर विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक जयवंतजी तांबे,बोधगया सत्य आणि विपर्यास या पुस्तकाचे लेखक ॲड.संदीप दादा जाधव ॲड.क्रांतीसिंह गडदे,चंद्रशेखर बागुल यांच्यासह नालंदा विधी महाविद्यालयाचे विश्वस्त अभिजीत ढोबळे, संस्थेचे सचिव तसेच प्रिन्सिपल मिलिंद गजधने, नालंदाचे प्रिन्सिपल डॉ.जगन्नाथ पाटील, कॅप्टन सुरज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जे लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान नाकारत आहेत. समाजात द्वेष,हिंसा, अराजकता, पसरवीत आहेत. अशा माओवादी, नक्षली, संघटनांमध्ये काम करणाऱ्यां संघटनांवर आणि लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला जन सुरक्षा कायदा काम करणार आहे..जन सुरक्षा कायद्यान्वये कुणालाही अटक करता येते, असा कायदा भारतात कुठेही नाही असा खोटा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे.अशावेळी कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि या कायद्याचे गाढे अभ्यासक ॲड.प्रदीप गावडे यांनी केले.
.महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याबद्दल बोलताना ॲड.प्रदीप गावडे पुढे म्हणाले महाराष्ट्रात हा कायदा आल्यानंतर काँग्रेस येथे विरोध करत आहे.परंतु याच काँग्रेस पक्षाने 1992 मध्ये आंध्र प्रदेशात सत्तेवर असतांना जन सुरक्षा कायदा आणला.ओरिसामध्ये 2005 छत्तीसगड मध्ये 2003 मध्ये जन सुरक्षा कायदा आलेला आहे. तरीही भारतात असा कुठे कायदा नाही. असा अपप्रचार या लोकांकडून केला जातो अपप्रचार करणाऱ्यांना बळी पडू नका. या कायद्याची व्यापक जनजागृती आवश्यकता आहे. ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भारतीय संविधान ज्यांना मान्य नाही तेच या कायद्याला विरोध करत आहेत असा आरोपही ॲड. प्रदीप गावडे यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले माओवाद, नक्षलवाद हा गडचिरोली सारख्या जंगली भागापुर्ता मर्यादित असल्याचे सांगितले जाते परंतु तो गैरसमज आहे.तो जंगलापुर्ता मर्यादित नाही तर देशभक्त युवा मंच, कबीर कला मंच, अशा माध्यमातून तो शहरातही कार्यरत आहे.अशा वेळी पॉलिटिकली कुणी काही म्हणो परंतु नॅशनल सिक्युरिटी साठी आणि राज्याच्या सिक्युरिटी साठी राज्य सरकारने केलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन ॲड.प्रदीप गावडे यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याबद्दल विपर्यास आणि वास्तव याबद्दल ऍडव्होकेट प्रदीप गावडे यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां समोर अभ्यासपूर्ण विवेचन करून मांडणी केली.
नालंदा विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ही यावेळी मोठी उपस्थिती लावली होती.
विवेक विचार मंच चे मुंबई महानगर संयोजक जयवंत जी तांबे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती.
नालंदा विधी महाविद्यालयाच्या मान्यवरांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
0 Comments