सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील, धार्मिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी पितृतुल्य नाना डांबरेकर यांचे दुखद निधन.! एका पर्वाचा अस्त.! 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.!आंबेडकर घराण्याचा एकनिष्ठ शिलेदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा चालता, बोलता, इतिहास काळाच्या पडद्याआड,! आंबेडकरी चळवळीतीत हळहळ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील, धार्मिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी पितृतुल्य नाना डांबरेकर यांचे दुखद निधन.! एका पर्वाचा अस्त.! 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.!
आंबेडकर घराण्याचा एकनिष्ठ शिलेदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा चालता, बोलता, इतिहास काळाच्या पडद्याआड,! आंबेडकरी चळवळीतीत हळहळ.

मुंबई | समाजभूषण तानाजी कांबळे
7507966260 | tanajikamble@gmail.com

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारिप, आणि भारिप बहुजन महासंघ या ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची जिल्हाध्यक्ष पदाची दीर्घकाळ जबाबदारी सांभाळणारे वंचित, शोषित,बहुजन , समाजाचे अग्रणी नेते, कणकवली तालुक्यातील डांबरे गावचे सुपुत्र ज्ञानदेव सोमा जाधव अर्थात नाना डांबरकर यांचे 23 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 4 वाजता त्यांच्या डांबरे येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. दिवंगत नाना डांबरीकर यांच्या पार्थिवावर उद्या 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. असे अधिकृतपणे भारतीय बौद्ध महासभा कणकवली तालुका शाखा आणि गाव शाखा डांबरे यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
गेली दोन वर्ष नाना डांबरेकर घरीच होते. गुडघ्याचे ऑपरेशन करूनही त्यांना चालता येत नव्हते. दिवंगत नेते नाना डांबरे कर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, मोठे भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेचे, वंचित शोषितांचे नेतृत्व करीत असताना आदरणीय नानां ना अनेक पक्षाकडून आमिष आली परंतु त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा कधीही सोडला नाही.आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते राजगृहाशी तथा आंबेडकर घराण्यशी एकनिष्ठ राहिले.

परमपूज्य बोधिसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर कणकवली तालुक्यातील नांदगाव हे चळवळीचे दीक्षा केंद्र होते. याच केंद्राला डांबरे फोंडा आधी अनेक गावे जोडली गेली होती. 1962 नंतर या केंद्रातच धर्मांतराचे दीक्षांत समारंभ मोठ्या प्रमाणात होत होते. आणि या दीक्षा केंद्राचे दिवंगत नेते नाना डांबरेकर हे उपाध्यक्ष होते. नानां एवढा कुणी सुशिक्षित त्या काळात नव्हता या शतकातच नानाची नाळ आंबेडकरी चळवळीला जोडली गेली ती अखेरपर्यंत ते चळवळीशी प्रामाणिक राहिले. 

आंबेडकरी ,बौद्ध जनतेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते म्हणून दिवंगत नेते नाना डांबरेकर यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती. अनेक प्रश्नांवर कणकवली प्रांत कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर दिवंगत नेते नानां डांबरेकर यांच्या नेतृत्वाखाली झंझावाती मोर्चे काढण्यात आलेले आहेत. दिवंगत नेते नाना डांबरेकर आंबेडकरी चळवळीचा चालता बोलता इतिहास आज काळाच्या पडद्याआड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

*जनिकुमार कांबळे यांचा*
*शोक संदेश* 

नाना डांबरेकर यांच्या रूपान निष्ठावान आंबेडकरी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आज आम्ही गमावलं आहे.
नानांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे अपरिमेत असे नुकसान झाले आहे.हे नुकसान कधीही भरून येणार नाही. अशी प्रतिक्रिया दिवंगत नेते नाना डांबरेकर यांचे अनेक वर्षांचे सहकारी,भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष, कवी,गायक, भीमशाहीर जनिकुमार कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले आंबेडकरी,बौद्ध जनते साठी दिवंगत नेते नाना डांबरेकर अखेर पर्यंत झटत राहिले.नाना एक संघर्षशील नेते होते. ते आज काळाच्या पडद्याआड गेल्याने असा नेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा होणे नाही.नानांनी सातत्याने समाजाचाच विचार केला. राजगृहावर,आंबेडकर घराण्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. ती त्यांनी अखेरपर्यंत जपली.नानांकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. या जिल्ह्यात नानांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे काढण्यात आले. त्याचे नेतृत्व नानांनी केले. नानांसारख्या एका मोठ्या नेत्याला आम्ही आज मुकलो आहोत.सार्वजनिक आणि वैयक्तिक रित्या नानांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. अशी भावना जनिकुमार कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
*विश्वनाथ कदम सर*
*माजी जिल्हाध्यक्ष यांचा शोक संदेश*

दिवंगत नेते नाना डांबरेकर यांनी दीर्घकाळ शोषित वंचित बहुजन समाजाचे नेतृत्व केले आहे.आज वंचितचा जिल्ह्यातील आवाजच काळाच्या पडद्याआड गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले असल्याचा शोक भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी व्यक्त केला आहे.
सर्व जाती समूहाला सोबत घेऊन सरकार दरबारी नानांनी प्रश्न मांडल्याने ते सोडून घेतले नानांचे आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिवंगत नेते नाना डांबरे कर यांनी मार्गदर्शन केले. प्रेम दिले. राजगृहातील कोणीही नेता आपल्या जिल्ह्यात आला तर त्यांचे संरक्षण आणि त्यांची व्यवस्था आपण काटेकोरपणे केली पाहिजे हा नानांचा संदेश आम्ही अंगीकारला आहे. आणि त्यांच्या संदेशाची अंमलबजावणी जबाबदारीने करतो आहोत.नाना इतर पक्षात गेले असते तर किमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तरी निश्चित झाले असते.परंतु दीर्घकाळ सत्ते बाहेर राहून अखेरपर्यंत त्यांनी श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.पुढील काळ नाना सारखा नेता होईल का ? याची शंका आणि खंत वाटते अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ञ आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम सर यांनी व्यक्त केली आहे.

::::::::::::::::::::::::

Post a Comment

0 Comments