उबाठा गटाला चाचा.नेहरूचा पुळका
नेहरूवर टीका करणे सोपे आहे पण नेहरू बनने कठीण आहे हे वक्त्यवं आहे शिवसेना उबाठा गटाचे ऑपरेशन सिंदूर वर संसदेत चर्चा झाल्या पासून उबाठा गटाला नेहरू प्रेमाचा भलताच उमाळा आल्याचे दिसत आहे
नेहरूच्या तुलनेत मोदी - शहा धुलिकनाच्या क्षमतेचे नाहीत, लोकशाहीवादी नेहरूनी आर एस एस वरील बंदी उठवून संघाला जीवदान दिले त्या मुळे आजचा भाजपा जों सत्तेवर बसला तो दिसलाच नसता, नेहरू हे विज्ञानवादी होते काँग्रेसला नेहरु यांनी आंतरराष्ट्रीय दृष्टी दिली लोकशाही, समाजवाद, धर्मनिपेक्षता, नियोजन हया नेहरूच्या कल्पना प्रभावी ठरल्या
्चाचा नेहरू यांचा स्वातंत्र्य लढ्याचा, तुरुंगात जाण्याचा, भारताला आधुनिकतेकडे नेण्याचा इतिहास आहे
नेहरूवर टीका करणे सोपे आहे पण नेहरू बनने कठीण आहे हे वक्त्यवं आहे शिवसेना उबाठा गटाचे ऑपरेशन सिंदूर वर संसदेत चर्चा झाल्या पासून उबाठा गटाला नेहरू प्रेमाचा भलताच उमाळा आल्याचे दिसत आहे
मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या बाता मारणारी, कैवार घेणारी शिवसेना उबाठा गटाला अचानक चाचा नेहरूच्या प्रेमाला पान्हा का फुटला असा प्रश्न मर्द मराठी मावळ्यांना पडणे साहजिकच आहे कारण नेहरू चाचा महाराष्ट्र द्रोही होते मराठी भाषेचे, मराठी माणसाचे हाडवैरी होते हा इतिहास आहे
मुंबईला महाराष्ट्र आणि मराठी माणसा पासून तोडण्याचा कुटील डाव चाचा नेहरू यांचाच होता हा इतिहास आहे मुंबई गुजराथ राज्याला देण्याची नेहरूची कूटनीती होती महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी सम्राज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे मानःबिंदू छत्रपती शिवाजी राजे यांना चोर, डाकू, लुटे रा असा उल्लेख नेहरू यांनी आपल्या " भारत की खोज " हया पुस्तकात करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या चाचा नेहरूची वकिली, दलाली उबाठा शिवसेना गट करीत असल्या मुळे उबाठा गट सोनिया, राहुल, प्रियांका यांची लाचारी, चाटूगिरी करीत असल्या बद्दल चीड, संताप व्यक्त केला जात आहे
मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून 105 हुतात्म्याना आपले रक्त सांडवावे लागले त्यास सर्वस्वी नेहरू जबाबदार आहेत नेहरूच्या महाराष्ट्रा वरील अन्यायाचा पाढा फार मोठा आहे नेहरू यांचे महाराष्ट्राशी असलेले हाडवैर, नेहरूची कुटनीती मुळेच परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ताकदीणीशी उतरले होते, बाबासाहेबांचे उजवे हात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नेतृत्व केले
ह्याच चाचा नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अतोनात छळ केला, पदोपदि अवमान केला, बाबासाहेबाना कायदेमंत्रिपदाचा राजीनामा संसदेत देऊन राजीनामायाबाबत संसदेत भाष्य करावयाचे होते परंतु कपटी चाचा नेहरू यांनी बाबासाहेबांचा राजीनामा संसदेत मांडलाच नाहीं तो आधीच मंजूर करून घेतला संसदेत बाबासाहेबाना राजीनामा्यावर भूमिका मांडण्याची मागणी खासदारांनी केल्या नंतर नेहरूने संसदेत खुलासा केला आंबेडकर यांचा राजीनामा मंजूर झाल्या मुळे त्यांना संसदेत बोलता येणार नाहीं यावर बाबासाहेबानी विश्वासघात अशी प्रतिक्रिया नोंदवून खेद व्यक्त केला होता
बाबासाहेबानी कायदेमंत्र्याचा राजीनामा दिल्या नंतर ह्याच कपटी, कारस्थानी नेहरूने बाबासाहेबाना पुन्हा संसदेत निवडून येऊ दिले नाहीं
1951 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईच्या शिवडी लव्हग्रोव्ह लोकसभा मतदार संघात नेहरने नारायण काजरोळकर हया हरिजनास उमेदवारी देऊन उभा केला इथे देखिल बाबासाहेबांचा विश्वासघात झाला पुणे करार प्रसंगी राखीव मतदार संघात काँग्रेस उमेदवार उतरविणार नाहीं अशी अट असा शब्द देऊन देखिल नेहरू यांनी बाबासहेब आंबेडकर विरोधात काजरोळकर उमेदवार उभा केलाहोता नेहरूच्या काँग्रेस पार्टीचा मुंबई अध्यक्ष स का पाटील जों गुंडाचा सरदार होता त्याने गुंडगिरी केली मतदार यादीत घोळ केला कम्युनिस्ट पक्षाच्या डांगे याला हाताशी धरले डांगे च्या कमयुनिस्ट पक्षाने मतदानावर बहिष्कार टाकला हेतू असा की कामगारांची मते बाबासाहेबाना मिळू नये काँग्रेस- कमयुनिस्ट डांगे- नेहरू यांनी बाबासाहेबांचा पराभव घडवून आणला
पुढच्याच वर्षी 1952 सालात लोकसभेची पोट निवडणूक आली बाबासाहेबानी पोट निवडणुकीत उमेदवारी दाखल केली इथे देखिल काँग्रेस पक्षाने शेण खाल्ले इथे देखिल काँग्रेसने भाऊराव बोरकर हयास उमेदवारी देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उभे केले
भंडारा ज़िल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होते कन्हायलाल पटेल जों प्रफुल्ल पटेल याचा बाप शेठ सावकार बिडी कारखानदार, तेंडु पत्याचा व्यापारी त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला, काँग्रेसने इथे जात पोटजातीचा प्रचार केला दिल्लीत नेहरू चाचाचे सरकार होते पंतप्रधान नेहरू कडे भारी भक्कम बहुमत होते तरी पंतप्रधान चाचा नेहरू फक्त बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी दोन दिवस भंडाऱ्यात मुक्काम ठोकून बसले होते इथे देखिल बाबासाहेब पराभूत झाले
गांधी- आंबेडकर वादात नेहरूने कधीही समेंट घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाहीं, देशाची फाळणी मंजूर केली,जिना यास पाकिस्थान चा पंतप्रधान केले, जिना याचे लालूल चांगलं केले गांधी नेहरू यांनी विरोध केला नाहीं चकार शब्द देखिल काढला नाहीं परंतु गांधींने मात्र बाबासाहेबांच्या विरोधात आमरण उपोषण केले " स्वतत्र मतदार संघ " हिसकावून घेतला त्याचं वेळी नेहरूने करोवा कुन्जरोवा अशी तटस्थ भूमिका घेतली हया गांधी-आंबेडकर वादात तेल ओतण्याचे काम केले
बाबासाहेबांच्या हस्ते गांधींच्या उपोषणची समाप्ती करण्याचे निश्चित होते ठरले होते व तशी बाबासाहेबांची देखिल इच्छा होती परंतु कट कारस्थानी नेहरूने ती इच्छा देखिल पूर्ण होवू दिली नाहीं आपली लेक इंदिरा हिच्या करवी बाबासाहेब यांच्या गैर उपस्थितीत गांधींचे उपोषण सोडविण्यात आले
6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महपरिनिर्वाण झाले बाबासाहेबांच्या अंतिम दर्शना साठी नेहरू बाबू जगजीवन राम सोबत बाबासाहेबांच्या निवासस्थानी आले असता बाबासाहेबांचा अंतिम विधी दिल्ली येथे करण्याची मागणी करण्यात आली नेहरूने ती अमान्य केली ज्या खाजगी विमानाने बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत आणले त्या विमानाचे भाडे देखिल नेहरू किंव्हा नेहरू सरकारने दिले नाहीं वर्गणी करून ते भरावे लागले होते
अश्या नेहरू चाचाचे गुणगान उबाठा शिवसेना गटाने थांबवावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे
🟣🔵🟢🟡🟠🔴🔴🟠🟡🟢🔵🟣🟤

0 Comments