"आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम कवी गायक धम्मसेवक रंगनाथ चंद्रभान शेजुळे यांचे निधन जयभीम नगर गोरेगावात श्रध्दांजली केली अर्पण"...
मुंबई- आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व ख्यातनाम कवी लेखक गायक कालकथित धम्मसेवक रंगनाथ चंद्रभान शेजुळे साहेब यांचे अल्पशा आजाराने दिनांक ३० जुलै रोजी वयाच्या एकसष्टव्या वर्षी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय कांदिवली पश्चिम मुंबई येथे दुपारी दिड वाजता निधन झाले त्यांची अंत्ययात्रा मोठी बहीण श्रीम
मथुरा साळवे यांच्या घरा पासून मालाड पूर्व अप्पापाडयातून निघून रात्री बारा वाजता कुरार व्हिलेज स्मशानभूमीत
बौद्ध संस्कार पध्दतीने अग्नी संस्कार प्रंचड जनसमुदयाच्या उपस्थिती करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी श्रीम प्रभावती एक मुलगा व मुलगी असा परिवार असून दिवं. रंगनाथ शेजुळे यांचा जलदान विधी व जाहीर अभिवादन सभा तीन ऑगस्ट रविवार रोजी जयभीम नगर नांलदा बुध्द विहार सामाजिक संस्था लि.
संतोष नगर गोरेगाव पूर्व फिल्म सिटी मार्ग जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग मुंबई येथे संस्था अध्यक्ष अशोक जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बौदाचार्य व संस्थेचे सचिव श्यामराव हिवाळे गुरुजी व बौदाचार्य संजय ओव्हाळ गुरुजी यांनी संपन्न केला.सदर प्रंसगी प्रमुख उपस्थिती समाजभूषण बौदाचार्य- सो. ना.कांबळे गुरुजी यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात म्हणाले की, कालकथित रंगनाथ चंद्रभान शेजुळे साहेब हे ख्यातनाम लेखक कवी आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व होतेच पण त्याच बरोबर ते खरे धम्मसेवक होते, अनेक भन्ते भिक्षु यांची सेवा करत भिक्षु यांच्या समवेत प्रत्येक बुध्द विहारात बुध्द वंदना व भन्तेची धम्मदेसना झाल्यावर आपल्या शीघ्र कवितेतून बुध्द व भिम क्रांती गिते प्रबोधनात्मक आपल्या पहाडी आवाजात सादर करून उपस्थितीतांना मंत्रमुग्ध करायचे! गीत गायना बरोबरच धम्म प्रचार,प्रसार करण्याची एक जिंदादिल धम्मसेवक भिमसैनिक रंगनाथ शेजुळे होतेच!ते पोटापाण्याच्या लढाईसाठी मुंबईत मुक्काम देवठाणा ता.मंठा,जि.जालना मराठवाड्यातून १९७२ दरम्यान दुष्काळ दृष्य परिस्थितीतून मुंबईला येवून अर्धवट शिक्षण आरे मिल्क काॅलनी येथे सातवी पर्यंत शिकले, नंतर जयभीम नगर,त्यानंतर आप्पा पाडा येथे राहिले.नंतर पुन्हा खडक पाडा येथे राहिले, २०१३ साली ते आपल्या कुटुंबापासून विभक्त झाले मग ते बी एम सी काॅलनी संतोषनगर येथे मोठे बंधू त्र्यंबक चंद्रभान शेजुळे यांच्याकडे दोन वर्ष राहिले,त्यानंतर सुनील मोरे तसेच विठ्ठल खरात हिवाळे,खास करुन जयभीम नगर येथील नांलदा बुध्द विहाराचे अध्यक्ष अशोक जाधव व सल्लागार वृध्दांनद शिंदे यांनी आपल्याच बुध्द विहारात राहाण्याची व खानपानापासून या सर्व मित्र मंडळींनी कवी रंगनाथ शेजुळे यांना आपल्याकडे सहारा दिला, शेवटी त्यांची मोठी बहीण श्रीम मथुरा साळवे यांच्याकडे त्यांचा शेवटचा काळ मरे पर्यंत गेला, त्यांनी व त्यांच्या मुलानी त्यांची खूप सेवा केली आजारपणात सर्व त्यांनीच,त्याचा सर्व कांही पहिले, त्यांचा परिवार खडकपाडयात होता, घरदार सोडून रंगनाथ शेजुळे साहेब हे गिते गाणे,व
धम्म प्रचारार्थ शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराने ईतके भारावून गेले होते की कुटुंबाला कायमचेच सोडून बौद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी आपले जीवन शेवट पर्यंत त्यांनी अर्पण केले, किती मोठा त्याग शेजुळे साहेबांचा होता,त्यागा शिवाय मोठे पण नाही,हे त्यांना मनोमनी
पटले होते! सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक संगीतमय उल्लेखनीय कार्य त्यांचे अतिशय महान असल्याने शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीत त्यांचे फार मोठे योगदान होते असे सो.ना.कांबळे आवर्जून म्हणाले, "शेजुळे साहेबांचा पोषक नेहमीच सफेद जॅकेट व मस्तकाला उभा निळा टिका, गळ्यात निळा गमच्या,डोळ्यावर हिरो सारखा गाॅगल रुबाबदार राहाणीमान दररोज हातात दैनिक वृत्तरत्न सम्राट पेपर घेऊन गोरेगाव रेल्वे स्टेशन वरून मालाड पूर्व गोरेगाव पूर्व संतोष नगर जयभीम नगर नागरी निवारा परिसर आदि भागात दिवसभर पायी सतत फिरायचे, लहान मुलांना चाॅकलेट वाटत,मुलेही चाॅकलेट साठी त्यांची वाट पहात जयभीमवाले अंक्कल म्हणून आवाज केला की त्यांना फारच गगनात मावेनासा आंनद होवून नेहमीच हसत मुख राहायचे! हा त्यांचा नित्य दैनंदिन कार्यक्रम असायचा आगदी लहान थोरा पर्यंत दिवसभर जयभीम बोलायचे!"
मिळेल ते खावून गुजरान करायचे स्थायिक नगरसेवक आमदार खासदार अनेक मातब्बर मान्यवर जनतेशी आपली ओळख निर्माण करून "जयभीम"चा नारा बुलंद करणारे मानापमानाची परवा न करणारे गोरेगाव संबध विभागातील आंबेडकर चळवळीची शान व "निळे वादळ" गेल्याचे सच्चा भिमसैनिक धम्मसेवक शेजुळे साहेब हरपल्याने झाले असून त्यांच्या जाण्याने दु:खत वातावरण निर्माण झाल्याचे सो ना कांबळे यांनी सविस्तर सांगून आपल्या शोकभावना व्यक्त करून कांबळे म्हणाले की तिन चार वेळा माझ्या ही घरी प्रत्यक्ष येवून माझ्या पत्नीसह मुलीला गीत गायनाचे धडे दिल्याचे नमुद करून शेजुळेना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
"जयभीमचा नारा देत भिमगर्जना करणारा आपल्या विभागाची आणबाण शान "ढाण्या वाघ" शेजुळे गेल्याचे" सदर प्रसंगी सर्वश्री रिप जेष्ठ पँथर नेते वृध्दांनद शिंदे,अर्चना जाधव,पुतणे अशोक शेजुळे,पत्रकार राजकिरण साळवे संपादक राष्ट्रीय सनसनी वार्ता, सुरज रंगनाथ शेजुळे, आदिने श्रध्दांजलीपर भाषणात आपले मत व्यक्त केले, नालंदा बुध्द विहार महिला मंडळासह तुडुंब गर्दीत शोकसभा संपन्न झाल्याचे व गोरेगाव पूर्व मुंबई परिसरात शोककळा पसरल्याचे मुक्त पत्रकार समाजभूषण सो.ना.कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आपला विनित
✍️मुक्त पत्रकार समाजभूषण सो ना कांबळे गुरूजी उपाध्यक्ष मुं.प्र.रिप (आ)
M0.9702992626 Sona24rpi@gmail.com

0 Comments