भिकू संघास युनायटेड बुद्धिस्ट मिशन, सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मुंबई संचलित अपंग,मूकबधिर, सेवा संस्थान निवासी विद्यालय सोनगाव चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती यांच्यावतीने वर्षावासानिमित्त धम्मदेसना वृक्षारोपण ध्यान साधना स्नेहभोजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई | प्रतिनिधी 
भिकू संघास युनायटेड बुद्धिस्ट मिशन, सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मुंबई संचलित अपंग मूकबधिर सेवा संस्था निवासी विद्यालय सोनगाव चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती यांच्यावतीने वर्षावासानिमित्त धम्मदेसना वृक्षारोपण ध्यान साधना स्नेहभोजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वविख्यात पूजनीय भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो विपश्यनाचार्य हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तसेच थोर समाजसेविका कमलताई रामकृष्ण गवई या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती संस्थेच्या ट्रस्टी व खजिनदार अनुराधाताई रोकडे यांनी दिली आहे. 
रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता अपंग मूकबधिर सेवा संस्थान निवासी विद्यालय सेनगाव तालुका चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे
.

परिसरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,सभासद, उपासक ,उपासिका,यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु, विपश्यनाचार्य, पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी  जी महाथेरो यांच्यावतीने संस्थेच्या ट्रस्टी आणि खजिनदार अनुराधाताई रोकडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments