पत्ता कटावू अनिल परब शिवसेना उबाठा गटाच्या ऱ्हासास, वाताहतीस जितुके संजय राऊत जबाबदार आहे तितकाच किंबहुना जास्त अनिल परब जबाबदार आहे

पत्ता कटावू अनिल परब 
        शिवसेना उबाठा गटाच्या ऱ्हासास, वाताहतीस जितुके संजय राऊत जबाबदार आहे तितकाच किंबहुना जास्त अनिल परब जबाबदार आहे 
मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडून गेलेले अनिल परब यांना विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पदाचे स्वप्न पडू लागले आहे, अंबादास दानवे यांचा पत्ता कट झाल्या नंतर हया पदाचे प्रबळ दावेदार सचिन अहिर यांचा पत्ता कट करण्याचे कटकारस्थान अनिल परब कडून सुरु आहे 
     अनिल परब कट कारस्थानाचा सम्राट आहे त्याने आज पर्यन्त अनेकांचे पत्ते कट केले आहेत, शिवसेनेचे संस्थापक नेते मधुकर सरपोतदार जे बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे सहकारी, उजवे हात होते विदर्भ, मराठवाड्यात शिवसेना नेली, रुजवलीच मुळात मधुकर सरपोतदार यांनीच त्यांनी अनेक आंदोलणे, लढे, संघर्ष केला 1993 मधील हिंदू - मुस्लिम दंगलीत त्यांना रा सु का कायद्याखाली अटक झाली होती नाशिकच्या सेंट्रल जेल मध्ये बंदी होते उच्चं शिक्षित व जॉन्सन अँड जॉन्सन हया नामवंत कंपनीत मॅनेजर पदावर नोकरीं करणारे सरपोतदार साहेब आमदार, खासदार म्हणून निवडून आले त्यांचे निवासस्थान मातोश्रीच्या अंगणात खेरवाडी गांधी नगर हया म्हाडा वसाहतीत होते अर्थात मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असल्या मुळे सरपोतदारांचा बहुतेक वेळ मातोश्री येथेच असायचा बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत घानिष्ठ संबंध शिवाय बाळासाहेबाशी नाते संबंध त्या मुळे सरपोतदार यांचा मातोश्री परीसरात व कुटुंबात प्रचंड दबदबा होता 
        अनिल परब याने सरपोतदार - ठाकरे कुटुंबात भांडणे लावली सरपो दारांचा एकुलता एक मुलगा ज्याचे राज ठाकरे सोबत मैत्री संबंध होते त्याचे भांडवल करून अनिल परब याने दोन कुटुंबात कटुता निर्माण केली शेवट असा झाला सरपोतदार यांचे मातोश्री सोबतचे नाते ऋणानुबंध संपले अनिल परब याची वाट मोकळी झाली 
       सरोपोतदार नंतर दुसरा पत्ता कट झाला श्रीकांत सरमळकर यांचा 
श्रीकांत शाखा प्रमुख होते तेही खेरवाडी म्हाडा वसाहतीत वास्तवयास होते नौपाडा - बेहरामपाडा - भारत नगर तसेच मुस्लिम अतिरेक्याकडून बाळासाहेब ठाकरे मातोश्रीला धोका होता शाखा प्रमुख श्रीकांत सरमळकर यांचा दरारा इतका भयानक होता की मातोश्री कडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत नसायची शाखा प्रमुख - नगरसेवक - आमदार, कामगार सेना नेते असा स्वबळावर प्रवास केलेल्या सरमळकर यांच्या बाबत लांडी लबाडी करून बदनामीचे कारस्थान सुरु केल्या मुळे 
सरमळकर यांना नारायण राणे सोबत जावे लागले आज त्यांचा मुलगा कुणाल सरमळकर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काम करीत आहे 
        सरमळकर यांचा काटा काढल्या नंतर, मातोश्रीचा मानस पुत्र, बाळासाहेब ठाकरेंचा लाडका शिवसैनिक बाळा सावंत यांचा नंबर लागतो नगरसेवक ते आमदार असलेले बाळा सावंत अत्यंत लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारा,अंतयात्रेत हमखास दिसणारा अंतविधीची सर्व कामे स्वतः करणारा, अंबुलेन्स, रुग्ण वहीका मुंबईतून गावाला किंवा गावाहून मुंबईला विनामूल्य पूर वीणारा असा बाळा सावंत यांचा लोकिक होता 
          मातोश्रीला काय हवे नको बघणारा, मातोश्रीत येणाऱया हर एक अभ्यागताची चहा, पाणी, पोहे याची सोय करणारा बाळा सावंत मातोश्रीचा जागल्या होता, बाळा सावंतच्या मर्जी शिवाय पान देखिल हालत नसे दुर्दैवाने बाळा सावंत यांचे कर्क रोगाने निधन झाले त्यांच्या मृत्यू नंतर बाळाची विधवा पत्नी तृप्ती सावंत यांना पोट निवडणुकीत उमेदवारी दिली त्यांनी नारायण राणे या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या त्या नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ह्याच अनिल परब याने काँग्रेसच्या बाबासाद्दीकी बरोबर हात मिळवणी करून, सौदेबाजी करून शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांचा पराभव करून झिशान सिद्दीकी यास निवडून आणले अनिल परब ह्याच्या गदारी मुळे, बाळा सावंत यांची विधवा पत्नी तृप्ती सावंत प्रचंड दुःखी झाल्या त्यांनी शिवसेनेचा त्याग केला
       अशोक जाधव, सुभाष कांता सावंत, राजू पेडणेकर अशी असंख्य शिवसैनिक उबाठा ला सोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहेत
अनिल परब आज मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचा हेड आहे सचिन वझे हया वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा पोलीस दलात नोकरीत सामील करून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर दबाव आणणारा, तसा तगादा आग्रह धरणारा दुसरा तीस रा कुणी नाहीं तो आहे अनिल परब हाच अनिल परब सचिन वझे यास शंभर कोटी रुपये खंडणी वसूल करण्या साठी डान्सबार मालक, पालिका ठेकेदार यांची यादी देत असे असा कबुली जबाब वझे याने कोर्टात दिला आहे वझे याने तुरुंगातून एक पत्र लिहून हया सर्व बाबी उजेड्यात आणल्या आहेत, बजरंग खैरमाटे हया परिवहन खात्यातील भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्याचा गॉडफादर अनिल परब आहे
      शिवसेना उबाठा गटाचे वाटोळे करणारा अनिल परब आहे आता सचिन अहिर यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा अहिर यांचा पत्ता कट करण्याचे कट कारस्थान अनिल परब याने सुरु केले आहे 
     आदित्य ठाकरे साठी वरळी विधानसभा मतदार संघावर पाणी सोडून आदित्य ठाकरे याच्या पाठीशी उभा राहणारे सचिन अहिर यांना त्यागाचे फळ मिळते का आदू बाबाला रात्रीचे मुंबई दर्शन नाईट लाइफ घडवीणारे आदू बाबाचे रात्रीचे सवंगडी अनिल परब पैकी कुणाचा पत्ता कट होतो बघण्यासाठी मराठी माणूस उत्सुक आहे
तानसेन ननावरे 
युनायटेड रिपब्लिकन पार्टी

Post a Comment

0 Comments