बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आणखी एका कार्यकर्त्याचा खड्डयात पडून मृत्यू .! या संपूर्ण घटनेला मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार.!रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे आंदोलन.!पवई रामबाग पोलीस ठाण्यावर मुं.म.न.पा.जबाब दो, आक्रोश आंदोलन.!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आणखी एका कार्यकर्त्याचा खड्डयात पडून मृत्यू .! या संपूर्ण घटनेला मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार.!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे आंदोलन.!
पवई रामबाग पोलीस ठाण्यावर मुं.म.न.पा.जबाब दो, आक्रोश आंदोलन.!

महाराष्ट्र संध्या | वृत सेवा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा संघटक सचिव मातंग आघाडी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष लालू गंगाराम कांबळे राहणार शेर पंजाब कॉलनी पंप हाउस अंधेरी (पूर्व ) मुंबई येथे वास्तव्यास असलेले रिपब्लिकन कार्यकर्ते लालू गंगाराम कांबळे हे अंधेरी ते पवई असा प्रवास करीत असताना पवई तलाव रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेच्या गलथान कारभारामुळे खड्डयात पडून अपघात झाल्यामुळे डंपरच्या खाली जाऊन जागीच मृत्यू झाला आहे.
या संतापजनक घटनेला सर्वस्वी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केला आहे.

या संतापजनक घटनेचा जाब विचारण्यासाठी उद्या सोमवार दि.28 जुलै 2025 रोजी दुपारी ठीक 1 वाजता ठिकाण रामबाग पोलिस ठाणे पवई मुंबई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले)यांच्या वतीने मुंबई म न पा जबाब दो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 


यावेळी उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव, अंधेरी तालुका अध्यक्ष संजयभाऊ खंडागळे, युवा जिल्हा अध्यक्ष सुनील बोर्डे, अंधेरी तालुका युवा अध्यक्ष गौतम मोरे, मातंग आघाडी मुंबईचे अध्यक्ष नंदू साठे,वॉर्ड अध्यक्ष देविदास गायकवाड महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस छायाताई खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments