महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अहिल्यानगर मध्ये होणार अनावरण .! जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु विपश्यनाचार्य पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो राहणार उपस्थित

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अहिल्यानगर मध्ये होणार अनावरण .! जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु विपश्यनाचार्य पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो राहणार उपस्थित

*अहिल्यानगर | प्रतिनिधी* 
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे  अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे भूषविणार आहेत. विशेष म्हणजे जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु, विपश्यनाचार्य, पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो यांना या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो भिक्खू संघासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी मार्केटयार्ड चौक अहिल्यानगर येथे सायंकाळी 5 वाजता पुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे.स्थानिक आमदार संग्राम अरुणकाका जगतात हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असुन महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे लोकप्रिय महागायक आनंद दादा शिंदे यांचा भीम गितांचा यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

खासदार सुरज विखे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार.विक्रम पाचपुते, यांच्यासह अनेक आमदार स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्म गुरु, विपश्यनाचार्य, पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो यांना या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले असून पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी जी महाथेरो, भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन या संस्थेच्या ट्रेझरर सामाजिक नेत्या अनुराधाताई रोकडे, संस्थेचे सचिव संजय कांबळे, तेजस्वी रोकडे यांच्या सह भिक्खू संघ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments