जगदविख्यात बौध्द धम्म गुरू,पुज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, विपश्यनाचार्य | यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश मा.भुषण गवई यांची सदिच्छा भेट.!
अमरावती | प्रतिनिधी
माजी खासदार | माजी राज्यपाल | महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती | दिक्षा भुमी स्मारकाचे शिल्पकार
स्मृतीशेष रा.सु. तथा दादासाहेब गवई यांचा दिनांक 25 जुलै 2025 रोजी स्मृतीदान होता.
जगदविख्यात बौध्द धम्म गुरू,पुज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, विपश्यनाचार्य,संस्थापक अध्यक्ष भिक्खु संघाज युनायटेड बुध्दीष्ठ मिशन, अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खु संघ, उपाध्यक्ष जागतिक बौध्द संघटन, (WFB ) अध्यक्ष वडऀ फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट,अध्यक्ष गुजरात महाराष्ट्र चाप्टर बुध्दा लाईट इंटरनेशनल असोसिएशन तैवान यांनी या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश मा.भुषण रामकृष्ण गवई सर त्यांचे बंधु मा.राजेंद्र गवई आणि मातोश्री कमल ताई रामकृष्ण गवई यांची सदिच्छा भेट घेतली.
पुज्य भदंत डॉ राहुल बोधी जी महाथेरो यांनी आपले वडील स्मृतीशेष रा.सु. तथा दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईवरुन अमरावती ला येवून उपस्थीती दाखवली त्या बद्दल गवई कुटुंबीयांनी पुज्य भदंत राहुल बोधी जी महाथेरो यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली..
यावेळी भन्ते संरक्षीत,युनायटेड बुद्धिस्ट मिशन मुंबई या संस्थेचे सचिव संजय कांबळे,युनायटेड बुद्धिस्ट मिशन मुंबई संचलित अपंग, मुकबधीर संस्थेचे संस्था प्रतिनिधी व विशेष शिक्षक मनोहर लांजेवार, ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments