समाजभूषण- सो.ना.कांबळे मुंबई.एक अनोखा शिव शाही वातानुकूलित एस टी बस बोरिवली मुंबई ते शिर्डी प्रवास प्रसंग..

समाजभूषण- सो.ना.कांबळे मुंबई.
एक अनोखा शिव शाही वातानुकूलित एस टी बस बोरिवली मुंबई ते शिर्डी प्रवास प्रसंग..

एस टी बस प्रवास बाबतचा जी आर महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्र.एस टी सी.१०१७|प्र.क्र.५२५|परि-१ गृह विभाग मंत्रालय ४०००३२ मुंबई ०९ ऑक्टोबर २०१८  प्रमाणेच आतापर्यंतच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्तना एस टी बस मधील सवलत देण्यात आल्यानंतर आजतागायत बदल केलेला नाही, सध्या या नमुद जी आर प्रमाणेच गृह विभाग परिवहन महाराष्ट्र राज्य शासनाकडून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारर्थीना त्यांच्या एक सहकार्या समवेत सर्वसाधारण, निम आराम,आराम बस, एस टी बस मधून प्रवास करण्यास निशुल्क शंभर टक्के सवलत   
आहे,
म्हणूनच शासनाकडे आपली सर्व सन्माननीय समाजभूषण पुरस्कारर्थीची नम्रतेची मागणी आहे की,वरील नमुद जी आर मध्ये बदल करून वातानुकूलित, शिवनेर, शिवशाही आदी एस टी बस मधून समाजभूषण पुरस्कार प्राप्त व एक सोबती सहकार्यास देण्यात यावी. वातानुकूलित शिवनेर,शिवशाही आदि सर्वच राज्य परिवहन बस मधून सर्व साधारण,निम आराम,आराम बस मधून सवलत देण्यात येते त्या प्रमाणेच सवलत देण्यात 
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारर्थीना देण्यात यावी अशी आपली अनेक वर्षांपासून मागणी आसून पंधरा हजार रुपये रोक रक्कम पुरस्कार स्वीकारताना होती ती आता पंच्याहत्तर हजार रुपयांत वाढ करण्यात आली त्या बद्दल राज्य शासनाचे हार्दिक अभिनंदन परंतू वातानुकूलित एस टी बस मधून प्रवास करण्यास एक व्यक्ति सोबत सवलत नाही, ती सवलत देण्यात यावी!
"एका समाजभूषण पुरस्कार प्राप्तानी कंडक्टर आगदी गोड बोलून एस टी प्रवासात सन्मान करतात असे समाजभूषण पुरस्कार प्राप्ताच्या व्हटशाॅपवर नुकतेच पोस्ट केली आहे त्याबद्दल मनापासून त्या  कंडक्टरचे अभिनंदन मनःपूर्वक शुभेच्छा"... 
"समाजभूषण सोपान नागोराव कांबळे अर्थात माझा प्रत्यक्ष २५ डिसेंबर २०२४ महिन्यातील प्रवास अनुभव आहे की,मुंबई बोरवली ते शिर्डी वातानुकूलित शिवशाही बस मधून आगोदर तीन दिवस दिनांक २२ डिसेंबर २०२४  रिझर्वेशन करून प्रवास २५ डिसेंबरला बोरवली ते शिर्डी प्रवास सुरु असताना मध्येच ठाणे एस टी बस स्थानकावर बस घेऊन सर्व प्रवाशा समोर बस
 कंडक्टरनी वाद घातला की तुम्ही तिकीट घ्या अन्यथा बस जाणार नाही! त्यात मी डेपो मॅनेजरला विनम्र विनंती केली की, माझा समाजभूषणचा पास चालत नाही तर रिझर्वेशन कसे काय माझे केले! व मला बोरीवली मुंबई पासून ठाणे एस टी बसस्थानका पर्यंत का आणले? मला व माझ्या एक सोबतच्या व्यक्तिला बोरीवली मुंबई एस टी बसस्थानकात बस सुरु होण्या अगोदर आम्हास का उतरवले नाही? तिकीट रिझर्वेशन त्याच ठिकाणी झाली होती,तिथेच चौकशीनंतर मला एस टी बस मध्ये चढू द्यायचे नाही तर उतरायचे
आम्ही घरी परत गेलो असतो नाहीतर तिकीट काढूनच आलो असतो किंवा दुसऱ्या बसने प्रवास केला असता, अर्ध्यावर रस्त्यावर आणुन आमचा सर्व प्रवाशांसमोर नाहाक त्रास देऊन आपमानित करून खाली उतरा म्हणता हे कांही बरोबर नाही असे मी वारंवार नम्रपणे सांगितल्यावर,एस टी मॅनेजर म्हणाले की, आपले म्हणणे आगदी बरोबर आहे,रिझर्वेशन तिकीट माझ्याकडे द्या म्हणल्यावर मी तिकीट दिले असता, त्यांनी तिकिटाच्या मागे लिहून दिले आणि कंडक्टरला सुचित केले की आपल्या तिकीट मशीन मध्ये जरी येत नसेल तर इतत्र अड मशीन मध्ये करा आणि माझ्या परवानगी या प्रवाशांना  घेवून जा व  परतीला सुध्दा यांच शिवशाही  वातानुकूलित बसने घेऊन या  झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर 
आहोत असे संबंधित अधिकाऱ्यांकडून बोलणे होवून समाजभूषण पुरस्कारर्थीना त्यांच्या एक सोबत व्यक्तिना  माझ्या परवानगीने प्रवास करण्यास मुभा आहे!
अर्ध्या तासानंतर पुन्हा प्रवास सुर झाला पण कंडक्टर व चालकाला थोडे आपमानित झाल्या सारखे वाटू लागल्याने    त्यांना मी आदरभावानी साहेब साहेब म्हणू लागलो माझ्या गोड बोलण्याने ते ही आगदी गोड बालू लागले ते म्हणाले की आमचा राग नाही आला का! नाही कारण आम्ही आहोत समाजभूषण...  
ज्याच्या अंगी नम्रता गुण त्यांचे फार मोठे पण!
आदरानी भावाने आदबशीर संवाद बोलने झाले कंडक्टर व चालक म्हणाले की, साहेब कांही अडचण आमच्या व्यक्तिगत झाल्या तर आपणास संपर्क करू आम्हास आपला मोबाईल नंबर द्या! दिस ओके म्हणून मोबाईल नंबर दिला..."
हा माझा व्यक्तिगत किसा जरी असला तरी तरी दुसर्‍याच दिवशी मंत्रालय गाठले,सामाजिक व विशेष सहाय्य विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि गृह विभाग परिवहन यात जावून जी आर घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली!
सत्य बाजू मला समजली! 
रिझर्वेशन करणाऱ्या कर्मचारी व्यक्तीस संगणकावर आपोआप रिझर्वेशन झाले आणि ते म्हणाले संगणक करतय यात माझी व आपली काहीच आडचण नाही तुम्ही बिनधास्त जावा शिर्डीला हे घ्या रिटर्न तिकीट!
त्यातून ठाणे एस टी बसस्थानक मॅनेजर ने आपल्याच आधिकारात केली सहानुभूतीपूर्वक मदत आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य शासनाकडून आहात याचा आम्हास सार्थ अभिमान असून आपला प्रवास चांगला व्हावा यांच्या दिल्या शुभेच्छा!
सर्वच सारखे नसतात हाताच्या बोटा प्रमाणे म्हण आहे ते सत्य!
कांही मदत कायद्यात नसून करतात! काही मदत कायद्यात तरतूद असून ही नाही करतात!
माझा जो प्रवास झाला त्या प्रसंगाने माझ्याकडे जी आर 
आला मी बोलता लिहिता अधिकारवाणी झालो म्हणूनच अधिकारवानी लिहु लागलो ज्या कंडक्टर व चालकानी वाद करुन शेवटी मदत केली, ज्या अधिकाऱ्यांकडून मदत झाली त्यांचे ही हार्दिक अभिनंदन मनःपूर्वक लाख लाख आभार!
एक अनोखा  वातानुकूलित शिवनेर एस टी बस प्रवास प्रसंग डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारर्थीचा वातानुकूलित बस प्रवास आजही तिकीट संभाळून ठेवले आहे जिता जागता प्रवास वर्णन!सदर लिखाण व माहिती सर्व सन्माननीय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्तांना...सादर व समर्पित 
सविनय सप्रेम जयभीम🙏
 [सन २०१०-११ पु ल देशपांडे सभागृह नागपूर येथे दिनांक १४ एप्रिल २०११ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र  पुरस्कार प्राप्त राज्य शासन]
समाजभूषण:- सो.ना.कांबळे तथा सोपान नागोराव कांबळे मुंबई 
M0.9702992626

Post a Comment

0 Comments