प्रति
आयुष्यमान रवींद्र चव्हाण साहेब
जयभीम, जयश्रीराम .!
जगातला सर्वात मोठा पक्ष भाजपा देशातला सर्वात मोठा पक्ष भाजपा राज्यातला सर्वात मोठा पक्ष भाजपा
राज्यात दीड करोड सदस्य संख्या असलेल्या भाजपा प्रदेश अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्या बद्दल
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप आभाळभर शुभेच्छा, आपल्या तरुण, तडफदार, झुंजार नेतृत्वात भाजपा शक्तिशाली, बलशाली होवो अशी तथागता चरणी प्राथर्ना
आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना जे तुफानी कामे केली मुंबई गोवा मार्ग त्यातले खड्डे आपण दिवसरात्र भरपावसात रस्त्यावर सर्व अधिकाऱ्यांना घेऊन हजर असत आपल्या कामाचा उरक, तत्परता, आत्मीयता, अभ्यास, समर प्रीत पणाची भावना बघून आम्ही तुम्हाला मोठ्या आदराने, प्रेमाने, श्रद्देने " छोटा गडकरी " अश्या नावाने संबोधित असू
भाजपा प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या शिरावर सोपविली आहे ही जबाबदारी आपण यशस्वी पने, उत्तम रित्या पार पाडालं असा विश्वास वाटतो
राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आपल्या समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे आपल्याला कर्तृत्व सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे अशी समस्त महाराष्ट्रातील जनतेची धारणा आहे
प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा नाहीं देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आपल्या पाठीशी आहेत त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद, त्यांची ताकद आपल्या पाठीशी आहेच आपल्या समोर आव्हान आहे कुशल प्रशासनाचे, पारदर्शी कारभाराचे, भ्रष्ट्राचार मुक्त प्रशासनाचे प्रदुर्शन मुक्त मुक्त मोकळी हवा, पोटभर स्वछ मुबलक पाणी, फुटपाथ पदचाऱ्या साठी चालण्या साठी, उत्तम दर्जेदार आरोग्य सेवा, स्थानिक स्वराज्य संस्थामधून गोरगरिबांच्या मुलांना उच्चं प्रतीचे शिक्षण, खड्डेमुक्त रस्ते हया आपल्या कडून अपेक्षा आहेत
अन्न वस्त्र निवारा हया किमान गरजा भागविण्याची दूरदृष्टी हवी आहे 80 टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या हे स्वप्न स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत पूर्ण होवू शकते उद्योग, दुकानें, कारखाने आदी सर्वाना लायसेन्स, परवाने, परमिट देने त्यांची पडताळणी करणे ही स्थानिक स्वराज्य सौस्थेची जबाबदारी आहे
मुंबईत फार मोठे मोठे गृह निर्माण प्रकल्प, पुनरविकास प्रकल्प सुरु आहे तीन तीन पिढ्या झोपडपसतीतल्या नरक यातना सोसलेल्या " धारावीचा" कायापालट सुरु आहे काही विकास विरोधी पक्ष संघटना अदानीच्या आडून धारावीच्या विकासाला विरोध करीत आहे, गेली दीडशे वर्ष जीर्ण झालेल्या बी डी डी / बी आय टी चाळीचा पुनरविकास मोठ्या वेगात सुरु आहे त्यात अनंत अडथळे अडचणी त्यात पोलिसांचे निवासस्थाने, मालकी हक्क, पात्र अपात्र, वाढीव बांधकाम हया सर्व अडचणीवर मात करून प्रकल्प जोमाने सुरु आहे
मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर पाऊनशे वर्षांपूर्वी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी बसविलेली, पुंरवासित केलेली वसाहत, महानगर पालिकेच्या मालकीची वसाहत रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला परंतु उपेक्षित होता राहुल गांधी रमाबाई नगरला भेट देऊन गेले परंतु विकासाचे एक शब्द देखिल बोलले नाहीं 24 हजार कुटुंबाचे पुनर्वसन काम सुरु आहे झोपड्या निष्कासित करून जमिनीचे अधिग्रहण झाले आहे आगामी 2/3 वर्षात प्रकल्प पूर्ण होऊन झोपडवासीय आपल्या हक्काच्या घरात गेले पाहिजे
म्हाडाच्या वसाहती अभुदय नगर, नेहरू नगर, टागोर नगर, कन्नमवार नगर, मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनरविकास प्रकल्पाचे नियोजन सुरु आहे काही ठिकाणी वर्क ऑर्डर निघाल्या आहेत तर काही ठिकाणी ठेकेदार, निविदा मागविल्या आहे
सिद्धार्थ नगर पत्राचाळ गोरेगावात संजय राऊत याने जमीन घोटाळा केल्यामुळे चार महिने तुरुंगात होता त्याच्या शेण खाण्यामुळे 672 मराठी कुटुंबे देशोधडीला लागली उध्वस्त झाली त्या मुळे होवू घातलेल्या अथवा सुरु असलेल्या प्रकल्पा मध्ये संजय राऊत सारखा शेणाचा किडा घुसता कामा नये ही जबाबदारी देखिल आपलीच आहे
मिठी नदीचा गाळ, उंदीर मारण्यात दलाली, मयताच्या कफन खरेदीत दलाली, गोरगरिबांच्या खिचडीत चोरी, बोगस रुग्ण, बोगस डॉक्टर, बोगस नर्स, बोगस रुग्णालये दाखवून हजारो कोटी रुपये हडप करणारी कचोरी कंपनी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिरकाव करता कामा नये हे बघण्याची जबाबदारी आपलीच आहे जन्माला आल्या पासून, शाळेत दाखल करण्यासाठी, आजारपणात औषध पाण्यासाठी, मृत्त्यू नंतर मयत दाखला घेण्यासाठी ज्या गोर गरीब दलित वंचित समाजाला दुसरा आधार नाहीं तो रिपब्लिकन आंबेडकरी समाज आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतो आहे त्या समाजाला विश्वास आणि दिलासा देणें भाजपा प्रदेश अध्यक्ष ही आपलीच जबाबदारी आहे काँग्रेसने फसवले, विश्वासघात केला तुमच्या कडे अपेक्षेने बघत आहे
खोटे बोलून, खोटा प्रचार, फेक नरेंटिव्हचा मुकाबला आपणा सर्वाना करावा लागणार आहे लोकसभेत संविधान बचाव तर आता मराठी वाचवा
रवींद्रजी आम्ही आपल्या पाठीशी आहोत विधानसभेतल्या प्रचंड विजयात आमचा घारीचा वाटा आहे
वर्गवीहीन, वर्ण विहीन समाज व्यवस्था निर्माण करणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न करण्यासाठी, समता - बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी आम्ही धडपडतोय आपल्या नेतृत्वात ऐतिहासिक परिवर्तन, बलशाही समाज, बलशाही राज्य होवो अशी शुभ कामना
कळावे, लोभ, स्नेह आहे तो वाढवावा
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी
0 Comments