मुंबई - रक्तदानाचे पुण्य फार मोठे असते.चरकाच्या शास्त्राप्रमाणे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असे जीवनदान असते.तरी हे रक्तदानाचे महत्व समाजामध्ये रुजविण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आता न्यायपालिकाही पुढे सरसावलेली दिसते.कारण बृहन्मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि या न्यायाधिकरणाची वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालय यांच्या सौजन्याने उद्या शुक्रवार २ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर मुंबईतील मोटार अपघात न्यायालय,९ हजारी सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर,बोरीबंदर,मुंबई-९ येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे.या शिबिरामध्ये न्यायालयातील वकील,कर्मचारी आणि अन्य रक्तदात्यांना सहभाग घेता येईल.तरी इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या पवित्र उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन बृहन्मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि वकील संघटनेच्यावतीने करण्यासाठी आले आहे.


0 Comments