भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा फोंडाघाट.




:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

नालंदा बुद्ध विहार येथे वर्षा वासाच्या निमित्त 

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

शालांत परीक्षा दहावी यशस्वी विद्यार्थ्यांचा भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य ज्येष्ठ विचारवंत जनिकुमार कांबळे यांच्या हस्ते शानदार सत्कार सोहळा संपन्न

🌻🌺💐🌸💕🌺🌻🌺

फोंडाघाट | प्रतिनिधी



भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव ,बोधिसत्व ,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एस.एस.सी.पास झाल्यानंतर वडील रामजीबाबा आंबेडकर यांच्या परिचयाच्या लोकांनी परळ मध्ये त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याच सत्कार सोहळ्यात दादासाहेब केळुसकर गुरुजी नी स्वलिखित भगवान बुद्धांचे चरित्र विद्यार्थी दशेतील भीमराव रामजी आंबेडकर यांना भेट दिले.केळुसकर गुरुजींच्या याच ग्रंथा मध्ये तथागत बुध्दांचे समतावादी आणि मानवतावादी विचार बाल भीमराव यांना वाचायला मिळाले. याच ग्रंथाच्या प्रभावाने विद्याथीऀ दशेतील भीमरावांचे मन आणि मत परिवर्तन झाले झाले.आणि पुढे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतामध्ये लाखो अनुयायांची ऐतिहासिक धम्मक्रांती घडवून आणली.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य,ज्येष्ठ विचारवंत,जनीकुमार कांबळे यांनी केले.


भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा फोंडाघाट येथील नालंदा बुद्ध विहार येथे वर्षावासा निमित्त  रविवार 1 ऑगष्ट रोजी शालांत परिक्षेत यशस्वी  झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थांच्या सत्कार समारंभा नंतर मार्गदर्शन करतांना भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, ज्येष्ठ विचारवंत जनीकुमार कांबळे बोलत होते.




न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या विद्यालयातून शालांत परीक्षा एसएससी पास झालेल्या विद्यार्थ्यां मध्ये पियुष मिलिंद जाधव 83 टक्के,यशदीप जयवंत जाधव 72 टक्के ,दीक्षा आनंद जाधव 70 टक्के ,

दिशांत दीपक जाधव 57 टक्के,गुण मिळवून हे विद्यार्थऀ उतिर्ण झाले आहेत त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक , बौद्धाचार्य, ज्येष्ठ विचारवंत जनिकुमार कांबळे यांनी भगवान गौतम बुद्ध,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ग्रंथ तसेच अंधश्रद्धा, विपश्यना ही पुस्तके भेट देवून पुढील यशस्वी वाटचालीसाठी या विद्यार्थांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सुत्र संचालन भारतीय बौध्द महासभा कणकवली तालुका शाखेचे कोषाध्यक्ष व फोंडाघाट गाव शाखेचे प्रमुख मार्गदर्शक सुभाष जाधव यांनी केले.गाव शाखेचे संघटक एस.आर. कांबळे, बौद्धाचार्य संतोष कदम,फोंडाघाट ग्रामपंचायती च्या माजी सदस्य ऋतुजा जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


त्रिसरण ,पंचशील,घेऊन कार्यक्रमाची सुरुवात तर सरनेतेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments