राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल जाहिर.

 बारावी परीक्षेचा निकाल जाहिर.





उद्योगश्री प्रभाकर पाटील ज्युनिअर कॉलेज खारेपाटण विद्यालयाचा विद्याथीॅ कु.मनिष बाळकृष्ण कांबळे 69 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण


 ‼️खारेपाट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असुन उद्योगश्री प्रभाकर लक्ष्‍मण पाटील जुनियर कॉलेज खारेपाटण या विद्यालयाचा विद्यार्थी मनीष बाळकृष्ण कांबळे याने 69 गुण मिळवून यश संपादन केले आहे.


3 ऑगष्ट 2021 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे .

राज्याचा निकाल 99.53 टक्के लागला आहे असुन 

राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.81 टक्के लागला आहे.


उद्योगश्री प्रभाकर लक्ष्‍मण पाटील जुनियर कॉलेज खारेपाटण या विद्यालयाचा विद्यार्थी व चिंचवली गावचा सुपुत्र मनीष बाळकृष्ण कांबळे याने 600 पैकी 414 गुण मिळवून 69 टक्क्याने यश संपादन केले आहे.


 कणकवली तालुक्यातील चिंचवली गावचे प्रतिष्ठीत नागरीक,आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकतेॅ,आणि समता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे चिंचवलकर यांचा कु.मनिष हा सुपुत्र आहे.


कु.मनिष याच्या या यशा बद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments