केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ..नियोजनाअभावी नागरिक त्रस्त

 केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ..नियोजनाअभावी नागरिक त्रस्त 



 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आज दोन लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होतं आज सकाळपासूनच दोन्ही लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा होत्या .मात्र महापालिकेकडून नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसून आला . नागरिकांनी रात्री अकरा वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या मात्र नियोजनाअभावी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागला . पहिल्या व दुसऱ्या डोस दीड हजार  कुपन वाटल्यानंतर कुपन  वाटप बंद करण्यात आले. त्यामुळे आठ तास ताटकळत उभे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत लसीकरण केंद्रात एकच गोंधळ घातला .शेकडोंच्या संख्येने नागरिक अत्रे रंग मंदिरात जमा झाले रांगेत असलेल्या  दोनशे नागरिकांना देखील कुपन दिले नसताना बाराशे कुपन संपतात कसे ,उर्वरित कुपन परस्पर वाटले जातात का ?  ज्यांचा वशिला आहे त्यानाच लस मिळते का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला यावेली पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले.

Post a Comment

0 Comments