रिपब्लिकन पक्षाचे वैभववाडी तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र
जंगम,अरविंद जंगम,अमित सपकाळ यांनी घेतली प्राथमिक आरोग्य
केंद्र सडुरे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट.
ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वैभववाडी तालुका युवा सरचिटणीस श्री नवलराज विजयसिंह काळे, रिपब्लिकन पक्षाचे वैभववाडी तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र जंगम,अरविंद जंगम,अमित सपकाळ यांनी घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट.दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे विनाकारण टेस्ट करण्याचे थांबवा दवाखान्यात सकाळी 9 ते संध्याकाळी सहा पर्यंत डॉक्टर उपलब्ध हवेत, तापाचा पेशंट आला तर करोना सहीत इतर आजारांवर तीही लक्ष द्या कावीळ, मलेरिया, डेंगू टायफाईड, हे आजार रुग्णांना होऊ शकतात त्यामुळे उपचार करताना फक्त कोरोनावर भर न देता इतर आजारांवर तीही लक्ष केंद्रित करा, दवाखान्यात टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करा नवलराज काळे त्यांच्यासहित रवींद्र जंगम यांनी केली मागणी.विनाकारण स्वॅबटेस्ट केल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण जनता उपचार घेण्यासाठी दवाखान्यात येण्यास घाबरते. उपलब्ध असलेल्या डॉक्टरने सांगितले सांगुळवाडी कोरोना सेंटरमध्ये ही जावं लागतं त्यामुळे 1 वाजेपर्यंत ओपीडि चालू असते. दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसेल तर दुसरा डॉक्टर अपोईंट करा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका.


0 Comments