रस्ते नको पण खड्डे आवरा’

 रस्ते नको पण खड्डे आवरा’ असे म्हणण्याची वेळ..  राष्ट्रवादीच्या

जिल्हाच्या सोशल मिडियावर व्हायरल


 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेत २००० साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने सत्ता उपभोगली होती.त्यांनतर राष्ट्रवादीला १० च्या वर पालिकेत आपले संख्याबळ वाढवता आले नाही.काही वर्ष हा पक्ष कल्याण-डोंबिवलीत दिसेल कि नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता.मात्र दोन-चार वर्षात राष्ट्रवादीने पुन्हा आपले ताकद दाखविण्यास सुरुवात केली आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याने राष्ट्रवादीला राज्याच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या राजकरणात पुन्हा उभारी आली आहे.राष्ट्रवादीने थेट व्यवस्थेवर  प्रहार करण्यास ससुरुवात केली आहे. स्थानिक व्यवस्थेचा आभाव, अपुरी सुविधा आणि करदात्या नागरिकांना अंधारात ठेवून थुकपट्टीची कामे यावर राष्ट्रवादीने प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवार केली आहे.राष्ट्रवादीने  पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सडकून टीका केली आहे.‘रस्ते नको पण खड्डे आवरा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याचे राष्ट्रवादीच्या जिल्हाच्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.


     राष्ट्रवादीच्या जिल्हाच्या सोशल मिडियावर लिहिले आहे कि,पावसाळयापुर्वी, पावसाळयात आणि पावसाळयानंतर खड्डे बुजविण्याच्या कामासाठी दरवर्षी १२ कोटींच्या आसपास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून तरतूद करण्यात येते.  त्यासाठी कंत्राटदार नेमले जातात. मात्र खड्डयांच्या पाश्र्वभूमीवर केली जाणारी डांबराची डागडुजी कुचकामी ठरली असताना आता हे खड्डे भरपावसात सध्या खडीने भरले जात आहेत. त्यातच ही खडी सुद्धा सर्वत्र पसरून त्रासदायक ठरत आहे. रेती आणि खडी वाहून जात असल्याने मनपाचे लाखो रूपये वाया जात आहेत. याला प्रशासन जबाबदार का? मागील आठवडयात पावसाने दडी मारली होती तेव्हा ही कामे का करण्यात आली नाहीत. नेहमीप्रमाणे कंत्राटे दिली जातात, कामेही चालू असल्याचे दिसतात परंतू कामांचा दर्जा पाहता ‘रस्ते नको पण खड्डे आवरा’ असे म्हणण्याची वेळ नागरीकांवर ओढवली आहे. शहरातील मुख्य चौकातही मोठया प्रमाणात खड्डे आहेत. रहदारी असलेल्या चौकातील खड्डयांकडेही मनपाचे दुर्लक्ष का झाले आहे? तात्पुरती खडी भरण्याची कृती निरूपयोगी ठरत असून एखादयाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? खड्डयांमुळे अनेक बळी गेले आहेत. त्यांना न्याय मिळाला का? त्या घटनांवरून किती अधिका-यांवर असे गुन्हे दाखल झाले? हे प्रश्न अनुत्तरीतच राहीले आहेत. २०११-१२  मध्ये केडीएमसीला नगररत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कल्याण शहरातील खडकपाडा, वसंत व्हॅली याठिकाणी केलेल्या रस्त्यांच्या नियोनजबध्द विकासाबाबत हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते तत्कालीन महापौर वैजयंती गुजर-घोलप आणि आयुक्त रामनाथ सोनवणो यांनी स्विकारला होता. परंतू त्यावेळीही रस्त्यांची इतरत्र पुरती दैनावस्था झाल्याने हा पुरस्कर वादग्रस्त ठरला होता.  याउपरही आजच्याघडीला रस्त्यांची दुर्दशा जैसे थेच राहीली असून वेळीच प्रशासनाने यातून धडा घ्यावा अन्यथा केडीएमसीचा ‘खड्डेरत्न' पुरस्काराने गौरव करण्याची वेळ करदात्या नागरीकांवर ओढावेल यात शंका नाही. रस्त्यांची बांधणी करताना किती नियमांचे पालन केले जात आहे का देखील महत्त्वाचा विषय आहे. सामान्य नागरिक म्हणून जो काही त्रास होत आहे त्या सगळ्याला फक्त आणि फक्त प्रशासन  जबाबदार आहेत असे तुम्हाला वाटत नाही का??? पुन्हा एका मृत्यू चक्राच्या फेऱ्यात करदाता अडकल्यावरच जाग प्रशासन जागे होणार आहे का ? अश्या अनेक प्रश्नांनी राष्ट्रवादीने सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे मांडले आहे.




Post a Comment

0 Comments