१० लाख ८० हजारांचे किंमतीचे ५७ मोबाईल हस्तगत करून केले
परत !
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी तसेच मोबाईल गहाळ होण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षभरापासून वाढ झाली आहे.यामध्ये पोलिसांनी तपास करत मोबाईलचे आय.एम ई.आय तसेच अनेक ठिकानावरचे सी.डी.आर चा तपास करून तब्बल १० लाख ८० हजार किंमतीचे ५७ मोबाईल हस्तगत करत नागरिकांना परत केले.
गेले वर्षभरापासून नागरिकांवर कोरोनाचे संकट आहे.त्यात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी होत असल्याचे तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये दाखल होत होत्या. यामुळे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठपोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे,पोलीस नाईक तुळशीदास लोखंडे व अंमलदार यांनी गेल्यावर्षभरात चोरीला व गहाळ झालेल्या मोबाईल चे आय.एम ई.आय तसेच सी.डी.आर चा तपास करून तब्बल १० लाख ८० हजारांचे ५७ मोबाईल हस्तगत करत नागरिकांना परत केले.



0 Comments