कल्याण स्टेशनजवळील रेल्वे पुलावर पालिकेच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण स्टेशनजवळील रेल्वे पुलावर चोरट्याने प्रवाश्यांना टार्गेट करून लुटण्याचे प्रकार सुरु केले आहे.पालिकेचे सफाई कर्मचारी रात्री उशिरा रेल्वे पुलावरील तिकीट बुकिंग हॉलमध्ये उभे असताना दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले.कर्मचाऱ्याने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या. यातील एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल लतीफ शेख ( २३,रा.वालधुनी-कल्याण ) आणि फजल फरीद खान (२३,वालधुनी-कल्याण ) असे अटक आरोपींची नावे आहेत. यातील फजल हा रेकोर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. फिर्यादी हे पालिकेचे सफाई कर्मचारी सुनील नारायण काकडे असून ते ८ तारखेला सुमारे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलावरील तिकीट बुकिंग हॉलमध्ये येथे उभे होते.रात्रीच्या वेळी बुकिंग हॉलमध्ये कमी गर्दी आणि पुलावर प्रवाश्यांची वर्दळ कमी असल्याने या दोघा चोरट्याने संधींचा फायदा घेत काकडे याच्या जवळ गेले.जवळ कोणीच नसल्याचे पाहत चोरट्यांनी त्याच्याकडील चाकू बाहेर काढून काकडे यांना धमकावले.घाबरलेले काकडे आपला जीव धोक्यात असल्याने आरडा-ओरड केली नाही. चोरट्यांनी काकडे याच्याकडील रोख रक्कम आणि एक सोन्याची अंगठी जबरदस्तीने घेऊन पल काढला. काकडे यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केल्यान पोलिसांनी तपास सुरु केला. चोरट्यांच्या चेहऱ्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला.यातील एका आरोपी रेकोर्डवर असल्याने पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. दरम्यान कल्याण स्टेशनजवळील रेल्वे पादचारी पूल रात्रीच्या वेळी प्रवाश्यांसाठी सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे या पुलावर रेल्वे पोलिसांनी गस्ती वाढवणे आवश्यक आहे.


0 Comments