पूरपरिस्थितीला भूमाफिया जबाबदार असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामे होत आहेत.याचा फटका यावर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसात दिसून आली.पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करत आहे का ? असा प्रश्न नागरिकांना पडला असताना भूमाफिया मात्र बिनदास्तपणे पालिकेच्या आरक्षित भूखंडावर आणि नाले बुजवून चाळी आणि टोलेजंग इमारती बांधतात.अशी बांधकामे करणाऱ्या विकासकांवर पालिका एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून आपले का एवढेच अशी भूमिका स्पष्ट करतात.वास्तविक शहरातील नाले बुजवून भूमाफियांनी केलेले बांधकाम नागरिकांना जगणे मुश्कील केले आहे.सत्ता उपभोगणारे जरी या परिस्थितीवर गप्प बसले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने यावर पूरपरिस्थितीला भूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप जिल्ह्याच्या सोशल मिडीया पेज व्हायरल केले आहे.
गेल्या चार –पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. या परिस्थितीचे खापर नालेसफाई योग्य न झाल्याची ओरड सुरु आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने याला भूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप जिल्ह्याच्या सोशल मिडीया पेज केला आहे.या पेज म्हणाले आहे कि, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेने अजूनही भरलेले नाही. असे असताना ठिकठीकाणी साचलेले पाणी भूमाफियांनी केलेले अतिक्रमणच आहे. पाणी साचण्याचे खापर नालेसाफईच्या कामांवरफोडले जात असले तरी पावसाचे पाणी खाडीत वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांसह छोटे नाले नाहीसे झाले आहे.मग पावसाच्या पाण्याचा निचरा होणार तरी कसा ? वाढत्या नागरीकरणात पालिकेकडून झालेल्या चुका आता खर्या अर्थाने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या परिस्थितीवर वेळीच उपाय शोधला नाही तर नागरिकांच्या सहनशिलतेच स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असेही जिल्ह्याच्या सोशल मिडीया पेज म्हंटले आहे.दरम्यान कल्याण-डोंबिवलीतील नाल्यावर भूकाफियांनी अतिक्रमण केल्याचा आरोपावर प्रशासन काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments