देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी

 आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!




 नमस्कार मित्रांनो, आजच्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात उद्यापासून चार महिन्यापर्यंत म्हणजे चातुर्मास, देव झोपी जाणार आहे.

 सदर काळामध्ये आपापल्या परीने जसे जमेल तसे लोकं ग्रंथाचे पारायण, अभंग, पोथी, पुराणांचे वाचन, तीर्थयात्रा जे जमेल तसे देव कार्य करीत असतात.

 चातुर्मासात दानधर्मला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामध्ये केलेले दानधर्म अधिक बळकटी मिळवून देते, फलप्राप्ती लवकर होते असा आघात आहे.

 पावसाळा सुरु झाल्यामुळे पशुपक्षी, प्राणी यांच्यावर आडोशाला आपले घरटे बांधून राहण्याची वेळ असते, अशावेळी आपल्या घराच्या बाजूला, गॅलरीत, जमेल त्या ठिकाणी पशु,पक्षी, प्राणी यांना आसरा द्या, 

जमेल त्या प्रमाणे भाकर तुकडा, पाणी यांची त्यांच्यासाठी व्यवस्था करा. गहू, ज्वारी, बाजरी, तांदळाचे दाणे अथवा सर्व मिक्स कडधान्य बाजारात कमी भावात मिळते. असे धान्य आणून पक्षांसाठी ठेवा, शेजारी पाण्याची व्यवस्था करा. बाहेर जाऊन कोणाला ब्राह्मण, पुजारी, भिकारी, फकीर, बाबा यांना दानधर्म केल्याने पुण्य मिळते असे नाही, म्हणून त्या मुक्या प्राण्यांना अन्नाचा कण आणि त्यापासून मिळालेल्या आनंदाचा क्षण अनुभवा. त्याने तुम्हाला आशीर्वाद मिळेल. 

देवाने सर्व प्राणिमात्रांमध्ये, पशुपक्ष्यामध्ये कोणाला दोन पाय दिलेत तर, कोणाला चार पाय दिलेत. 

फक्त माणसालाच देवाने बुद्धिमत्ता देऊन, पायावर उभे राहण्यासाठी मजबूत पाय देऊन हाताने काम करण्यासाठी दोन हात दिले आहेत. ज्याचा उपयोग करून आपण आपली उपजीविका करण्यासाठी मिळेल ते काम, आपल्या बुद्धिचातुर्याने पैसा कमावून आपले जन जीवन व्यथीत करत असतो.

 परंतु देवाने कोणालाही उपाशी ठेवले नाही, जन्माला आला त्याला चोच दिली आहे आणि त्या पोटाला अन्न ही दिले आहे. 

तसे पाहिले तर निसर्गाने सर्व काही फुकट दिले आहे.

 पशुपक्षी, प्राणीमात्र त्यांना हवा, पाणी, ऑक्सिजन, अन्न, फळे, विकत घ्यावे लागत नाही. त्यांना पुरेल एवढं देवाने निसर्गाच्या सानिध्यातून उपलब्ध करून दिले आहे.

 परंतु मानव प्राणी त्यांच्या आयुष्यात लूडबूडू करु लागल्यामुळे, शहर सोडून जंगलतोड करून जंगलात विहार करायला जाऊन त्यांची निवांत राहण्याची जागा होऊ लागला आहे. त्यामुळे मानवाला पाणी विकत घ्यावे लागत आहे, पुरेशी हवा न मिळाल्यामुळे ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. अन्नपुरवठाच्या ठिकाणी वेगवेगळी पिके घेऊन पैसे कमवण्यासाठी  पाठीमागे आहे.

 मनुष्य प्राणी पोटाला पुरेल त्यापेक्षाही जास्त कमवण्याची इच्छाशक्ती आणि लालसेपोटी आपली जीवनशैली बदलवून आयुष्य, आराम आणि लाईफस्टाईलचे जीवन जगणे करत असताना स्वतःचं अस्तित्व विसरून ब्रांडेड च्या पाठीमागे लागून स्वतःचं असलेला ब्रँड विसरत चालला आहे.

 आपली असलेली बुद्धिमत्ता आणि कलाकौशल्य स्वतःसाठी न वापरता थोड्या लालसेपोटी नको ते करू लागला आहे, म्हणूनच आपण आपली संस्कृती, आपला धर्म, आपले ग्रंथ, पारायण आणि रूढी परंपरा जपून आपली भारतीय संस्कृती वाढवली पाहिजे.

 आज अमेरिकेसारख्या प्रगत देशातही गायत्रीमंत्राचा जप केला जात असून, गोमूत्राचे सेवन केले जाते, गायीच्या शेनापासून बनवलेल्या गौरी जाळून घरांमध्ये धूप दाखवला जातो, आणि आपण त्यांच्या विरुद्ध जाऊन कार्य करू लागलो आहे. पैशाच्या नादात आपण आपलं अस्तित्व गमवायला नको एवढीच विनंती आहे.

 आपल्या आई वडिलांची सेवा करा, मनुष्य प्राणी सोंग करू लागला आहे त्यामुळे देव जसा पशुपक्षी प्राणिमात्राला उपाशी ठेवणार नाही तसेच तुम्हालाही उपाशी ठेवणार नाही.

 फक्त तुमची भूक जास्त झाली असेल तर ते तुमच्या पद्धतीने भागवण्याचे गरज आहे, म्हणून तुम्हाला बुद्धी दिली आहे. कोणताही पशुपक्षी, प्राणीमात्र स्वताच स्वतः साठी पैसा करत नाही आणि घरे अनेक बनवत नाही. बँक बॅलन्स आणि सोने-चांदी  घालून कधीच मिरवत नाही. आपण आपल्याकडे असल्यापेक्षा जास्त दाखवण्यातच धन्यता मानतो, आणि त्यामुळेच विनाश जवळ येत चालला आहे.

 धन्यवाद!

Post a Comment

0 Comments