कल्याण लोहमार्ग पोलिसांची उलेखनीय कामगिरी
प्रविण बेटकर
मोबा.-९५९४४०१९२२
कल्याण (ठाणे)
कल्याण रेल्वे स्थानकात दिनांक-१० जुलै २०२१ रोजी, कल्याण रेल्वे प्लाटफार्म क्रमांक-२ वर एका कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटदार विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस प्रा.लि. यांचा सफाई कामगार या प्रवाश्यास दोन अज्ञात इसमानी धक्काबुक्की व मारहान करण्याची धमकी देत त्याच्या खिश्यातील काही रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि या तिघांमध्ये हाताफल झाली त्यात त्या दोन्ही इसमाने सदर प्रकार उघडणीस येऊ नये म्हणून तेथून पळवाट काढली. सदरची संपूर्ण माहीती सतर्क पोलीस टाइम्सचे सहसंपादक डॉ.आदर्श भालेराव, प्रतिनिधी/पत्रकार अमित साळवे व दिपक मागाडे यांना कळताच त्यांनी तात्काळ लोहमार्ग पोलिस कल्याण ठाण्याचे गुन्हेशाखा अधिकारी -राजू आखाडे आणि एपीआय- रमेश चव्हाण यांची भेट घेतली व सदर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्ह्याची दखल घेत त्यांच्यावर तात्काळ भारतीय दंड संहिता कलम ३९२,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध मोहीम सुरू केली. सदर गुन्हा दाखल करताच दोन्ही आरोपीना २४ तासाच्या आत लोकमार्ग पोलीस यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छायाचित्राद्वारे दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून अटक करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार साहिल लतीफ शेख, २३ वर्षे, व फजल फरीज खान, २३ वर्षे, रा. वालधुनी कल्याण अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. फजल हा रेकॉर्डमधील गुन्हेगार असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. सुनील नारायण काकडे हे विशाल एक्स्पर्टचे कंत्राडी सफाई कामगार असून दुपारी १२ वा.च्या सुमारास कमी वर्दळ असल्याने ही घटना घडली.
या उलेखनीय कामगीरीस लोहमार्ग पोलिस ठाणे कल्याण यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


0 Comments