पालिका आणि पोलिसांच्या आशीर्वादाने डोंबिवलीतील दुकाने आणि बार सुरु
बारचे पाठचे दरवाजे ग्राहकांसाठी उघडे
डोंबिवली ( शंकर जाधव ) करोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंध लागू केले आहेत. शहरात दुपारी ४ नंतर अत्यावश्यक सेवा व्यक्तिरिक्त सर्व दुकाने आणि बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र राज्य सरकारच्या या नियमांना पायदळी तुटवत डोंबिवलीतील सर्रासपणे दुकाने आणि बार सुरु असतात.अगदी स्टेशनबाहेरील दुकाने उघडे असताना पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अश्या दुकानांना आणि बारला अप्रत्यक्षपणे परवानगी दिल्यासारखे कानाडोळा करत असल्याचे दिसते.बारचे पुढील दरवाजा जरी बंद असला तरी पाठच्या दरवाज्याने ग्राहकांना आत घेऊन मदिरा दिली जाते.या प्रकारला पालिका आणि पोलिसांचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही असे या परिस्थितीवरून दिसून येते. अश्या दुकानात आणि बार मध्ये ग्राहकांना बिनदास्तपणे आत घेतले जाते.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यत आणि शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.तर खाद्यपदार्थ देणाऱ्या दुकानांना, किरण माल यांना फक्त पार्सल सेवा देण्याचे बंधन आहे. राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध डोंबिवलीत पाळले जात नाही. मागच्या दरवाज्याने दुकाने तर काही दुकानदार दुकानाच्या समोर उभे राहून ग्राहक आल्यावर शटर उघडत आत घेतात.विशेष म्हणजे बारचे दरवाजे मागच्या बाजूने उघडे असल्याची माहिती तळीरामांना माहित असून पालिका आणि पोलिसांना माहित नसावा यावर सर्वाना आश्चर्य वाटत आहे.डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील सर्व बार अश्याच प्रकारे पाठच्या दरवाज्याने उघडे असतात.डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील प्रिती बार आणि रेस्टोरस्ट, डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनसमोरील क्षमा बार आणि रेस्टोरस्ट राजरोजपणे करोनाचे कोणतेही नियम न पाळता सुरु असते.तर पूर्वेकडील फडके रोडवरील गुलशन ज्यूस सेंटरला रात्रीचीही ग्राहकांची गर्दी दिसून येते.
करोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.मात्र सरकारने लागू केलेल्या निर्बंधांना दुकानदार आणि बारवाले पायदळी तुडवीत असल्याने यांना प्रशासनाने मोकळीस दिली आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.अनेक बारच्या मागे मद्यपी जाऊन त्याच्यासाठी बार मधील एक नोकर उभा असलेला दिसतो.मद्यपींना बारच्या पाठीमागील दरवाज्याने नेण्याचे काम हा नोकर करतो. हे बार बंद दिसत असले तरी प्रत्यक्षात आत मध्ये मद्यपींची गर्दी दिसते. मास्क घालणे व समाजिक अंतर या नियमाचे पालन न करता हे बार सुरु असल्याने पालिका क्षेत्र अधिकारी व कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड सुरु आहे.डोंबिवलीत करोना कमी झाला असला तरी दुसरीकडे बार व दुकानदारांना मिळत असलेली मुभा हे प्रशासनाच्या बेजबाबदार कामाकाजाचा पुरावाच म्हणावा लागेल.


0 Comments