समाज सेवा हिच देवपूजा - सौ. सविता ताई चव्हाण
ठाणे (विश्वनाथ पंडित) पूर्व येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वराज महिला मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील गरजू, गरीब, घरकाम करणाऱ्या महिलांना छत्र्यांचे विनामूल्य वाटप ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला ठाणे शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
स्वराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद कोळी, देवेंद्र साळेकर, भूपेंद्र कोळी, अनिल फलके, विनोद ठाणेकर, विश्वास जाधव काका, चंद्रकांत पांगारे, दिलीप शिंदे, पांडुरंग परब, सौ पूजा शिंदे आवर्जून उपस्थित होते. महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. सविताताई मनोहर चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
यावेळी सविता ताई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या अशाच प्रकारे विविध विधायक उपक्रमांच्याव्दारे प्रत्येकाने समाजऋण काही अंशी फेडण्यासाठी प्रयत्नशील रहावयास हवे. त्यांनी सहकार्य करणाऱ्या व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.


0 Comments