वैचारिक हुकूमशाही
जगात अनेकविध प्रकारचे स्वभावगुण बाळगुण असणारे मानव घेऊन गेले आहेत.एक व्यक्ती हा इतर व्यक्तिपेक्षा भिन्न असतो. मानसशास्त्रा प्रमाणे सर्व मानवास आपले स्वतःचे मत असून प्रत्येकाची विचारशैली ही भिन्न _ भिन्न स्वरूपाची असते. जगात जर सर्व मानव जातीचा एक समान स्वभाव राहिला असता तर आज आपण जेवढे विविध प्रकारचे मानवी कल्याणासाठी लागणारे शोध , लावले गेलेले शोध पाहत आहोत ते कदाचित लागले नसते. प्रत्येक मानवी स्वभाव हा भिन्न असल्यामुळे प्रत्येकाची निकड ही भिन्न असू शकते व गरज ही शोधाची जननी म्हटले जाते. गरजे वरूनच मग पुढे मानवी स्वभाव आकार घेत चाललेला असतो.
मानवी स्वभाव आकारातून निर्माण होत गेलेली गरज भागवण्यासाठी विविध प्रकारच्या मानवीवृत्ती ,मानवी स्वभाव , मानवी विचार , मानवी शैली तयार झाल्या .गरजेचे रूपांतर पुढे स्वभावात होत गेले, स्वभाव हा मावळ किंवा जहाल देखील आपल्या निदर्शनास आल्याखेरीज रहात नाही. ज्याने आपल्या स्वभावावर नियंत्रण मिळवले त्याने जगाच्या कल्याणासाठी, लोककल्याणासाठी ,मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे सकारात्मक कामे केलेली आहेत ,व याउलट ज्यांनी आपल्या स्वभावावरील नियंत्रण गमावले आहे ते जगासाठी तापदायक, धोकादायक , सर्वनाशी, अकल्याणकारी म्हणून जगाच्या पाठीवर उदयास आल्याचे आपण गतकाळातील ऐतिहासिक पुराव्यावरून पहात असतो व वर्तमान काळात देखील त्याचे चटके सहन करत आहोत, तथा येणार्या भविष्यकाळात देखील पृथ्वीतलावरील मानवास याचे भयंकर रूप पहाण्यास मिळू शकते याबद्दल दुमत असू शकत नाही.
निसर्गाने मानवी जीवनासाठी पृथ्वीतलावर जर कोणती अमूल्य देणगी दिली असेल तर ती म्हणजे "पाणी", पृथ्वीतलावर ज्याला सर्वात बुद्धिमान समजण्यात येते असा मानव हा इतर मूलभूत मानवी गरजा शिवाय काही दिवस जगू शकतो परंतु पाण्याखेरीज जगणे अशक्य आहे. मानवी शरीरात जवळ_जवळ 70 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पाण्याचे प्रमाण आहे व जस- जसे मानवी शरीरातुन पाण्याचे प्रमाण कमी होते जाते, तस - तसा मानव मृत्युच्या जवळ जात असतो, याच पाण्यावरून देखील प्राचीन काळी वैचारिक दडपशाहीमुळे, पाणी वापरातील वैचारिक मतभेदांमुळे मानवी संघर्ष उभा राहिलेला आहे व भविष्यात देखील कदाचित तिसरे महायुद्ध वैचारिक दडपशाहीमुळे होण्याचा धोका आहे.
जगातील वेगवेगळ्या अशा मानवी प्रवृत्ती मधून, मानवाचे स्वभावावरून नियंत्रण गमावल्याने, मानवाची सकारात्मक वैचारिक पातळी नष्ट झाल्याने मग मानवात हुकुमशाही प्रवृत्ती वाढीस लागत असते. बहुमतशाही ,आर्थिक सुबत्ता, अतिधर्मांधता, आंधळे सहमत, विशिष्ट विचार मतप्रवाह , अतीलालसा या कारणाने मानवत तयार झालेली हुकूमशाही मानवी अस्तित्वासाठी फार घातक ठरू शकते. एका विशिष्ट विचारधारेमुळे आकारास आलेली बहुमतशाही मधून निर्माण झालेली हुकूमशाही तर जास्त विध्वशंक व जगाच्या वैचारिक सहार करणारी ठरू शकते.
मानवा,- मानवात बौध्दिकवाद , लोकोन्नतीसाठी निर्माण झालेला वाद ,वैचारिक वाद असायला हवेत ते मानवी स्वभावांने असू शकतात हा सकारात्मक विचारसरणीचा भाग असतो परंतु बहुमतशाही विचारधारे मधुन निर्माण झालेली हुकूमशाही ही आपले विचार लोकांवर लादण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. जेव्हा लोकांच्या मुलभूत अधिकारांवर , वैयक्तीक स्वातंत्र्यावर , विचार करण्याच्या प्रक्रियेवर घाला घातला जातो त्याची परिणिती मानवी उद्रेक घडवून आणत असतो. भू-भाग लालसेपोटी, आर्थिक लालसेपोटी , राजसत्येपोटी स्वभावात निर्माण होणारी हुकूमशाही अल्पपरिणामकारक असते विरुद्ध विचार प्रक्रियेवर परिणाम करणार्या हुकुमशाही पेक्षा.
माझेच योग्य विचार आहेत असे एखाद्या मानवावर सतत वैचारिक आघात करणे म्हणजे समोरील व्यक्तीचे वैचारिक ,बौद्धिक तसेच रहिवासाचे देखील अस्तित्व नाहीसे करण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीला आपले मत मांडण्याची संधी पासून परावृत्त करणे म्हणजे त्याच्यावर आपली वैचारिक दडपशाही गाजवणे असा त्याचा अर्थ होत असतो . मानव जेव्हा आपल्या सदविचारांला साधन बनवत असतो त्यावेळी समाजजीवनात लोककल्याणकारी कामे होत असतात ,व जेव्हा मानवात सदविचाराची वैचारिक शक्ती क्षीण होत असते त्याकाळी त्याच्या वर्तनात हुकूमशाही निर्माण होत जाऊन त्याचा परिणाम मानवी अस्तित्वास धोका निर्माण करत असतो.
हेमकांत मोरे ,
नंदुरबार .
94 23 91 70 74.


0 Comments