बऱ्याच वेळेस निवडून येणे कामी लोकप्रतिनिधी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती /बनावट माहिती देतात ,मात्र मा सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाने लोकप्रतिनिधींनी निवडणूक कामी दिलेली माहिती मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे . त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वरती प्रत्येक लोकप्रतिनिधींचे प्रतिज्ञापत्र अपलोड केले आहे . हमारा विश्व फौंडेशन मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व मंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केला गेला मात्र त्यात महाराष्ट्रातील तब्बल १५ मंत्र्यांच्या (अशोक चव्हाण ,नाना पाटोळे ,वर्षा गायकवाड , हसन मुश्रीफ , अब्दुल सत्तार , विश्वजित कदम , दत्तामामा भरणे , संदीपनराव भुमरे , संजय रायमुलकर , धनंजय मुंडे , बच्चू कडू , उदय सामंत , सुनील केदार , के सी पाडवी , गडाख शंकरराव ) निवडणूक प्रतिज्ञापत्रातील जमीन खरेदी व इतर बाबत दिलेल्या खोट्या / बनावट माहितीआढळून आल्या यात काही मंत्र्यांनी
१)त्यांनी खरेदी केलेल्या वाहन बाबत वेगवेगळ्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी माहिती दिली आहे
२) एका निवडणूक प्रतिज्ञापत्रात एखादी शेतकीय जमीन त्यांनी विकत घेतल्याचे नमूद केले आहे तर दुसऱ्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात तीच जमीन वारसाहक्काने मिळाल्याचे नमूद आहे .
३) काही लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रात त्याच किंवा एकाच शेतकीय जमीनीच / वाणिज्य इमारतीचा / निवासी इमारतीचा खरेदी दिनांक व खरेदी किंमत वेगळी दाखवली आहे
४) काही लोकप्रतिनिधींनी शिक्षणा विषयी खोटी माहिती दिली आहे
या सर्वांबाबत हमारा विश्व फौंडेशन चे अध्यक्षा अनिता अगरवाल व कार्यालयीन अधीक्षक डॉ अभिषेक हरिदास यांनी मा . राज्यपालांकडे सदर १५ मंत्र्यांवर गुन्हा दाखल करणे बाबत सीआरपीसी १९७ नुसार परवानगी मागितली मात्र तीन महिने झाल्या नंतर हि कोणताही रिप्लाय राज्यपालांकडून न आल्याने प्रचलित कायद्यानुसार राज्यपालांनी परवांनगी असे स्पस्ट होत आहे . या बाबत हमारा विश्व फौंडेशनचे अध्यक्षा अनिता अगरवाल , डॉ अभिषेक हरिदास यांनी अॅड नितीन मस्के ,अॅड श्वेता भोसले ,यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील न्यायालयात १४ लोकप्रतिनिधींवर याचिका दाखल केली असून त्या बाबत दिनांक 28/06/2021 तारीख दिली आहे अशी माहिती , संस्थेचे पदाधिकारी शारदा चोकसे, संगीत शहा ,भाटू पाटील,अमोल उबाळे ,नितीन पाटेकर यांनी दिली
डॉ अभिषेक हरिदास
८८५७९९०६९२
८६६८४९३५९९


0 Comments