कोरोना काळातील बळीराजाचे योगदान




 जागतिक महामारी कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगभरातील अनेक विध व्यवसायांवर आणि व्यवसाय मालकांवर अतिशय गंभीर तसेच  कधीही भरू न शकणारे परिणाम केल्याचे आपल्या दृष्टीत आहे. देशाचे अर्थचक्र हे सर्वसमावेशक व्यवसायांवर निर्धारित असते मग ते छोटे व्यवसाय असो की मोठे व्यवसाय असो प्रत्येक घटक हा देशाच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवत असतो .आपल्या भारत देशाचा विचार केला असता आपण कृषिप्रधान देशात वास्तव्य करत आलेलो आहोत. आपला मुख्य व्यवसाय हा कृषी आहे. कृषी व्यवसाय हा कच्चामाल पुरवठा करणारा व्यवसाय आहे असे देखील संबोधले जात असते .


कृषी व्यवसाय हा अल्प गरजांवर तसेच अल्प कुशल मजुरांवर देखील काही प्रमाणात होऊ शकतो . याउलट जे आधुनिक उद्योग आहेत किंवा अति विकसित देशातील उद्योग आहेत ते भरमसाठ भांडवलावर व कुशल मजुरांवर अवलंबून असतात . तसेच शहरीकरणा जवळ असल्याने लोकसमूह एकत्र केल्या  शिवाय केले जाऊ शकत नाही आणि काही प्रमाणात का असेना मोकळ्या अशा नैसर्गिक वातावरणात अधुनिक कारखानदारीचे व्यवसाय करण्यात मर्यादा आल्याखेरीज रहात नाही . बळीराजा हा निसर्गरम्य , आरोग्यदायक व अल्प गरजाधारित व्यवसाय करत असतो.


 भारतात शेतकरी हा असा मानवी समूह आहे जो स्वतःच्या अंगावर साधे कपडे परिधान करतो परंतु त्याने मेहनतीने जमिनीच्या पोटातून निर्मित केलेल्या उत्पादनाचा फायदा घेऊन इतर व्यक्ती रुबाबदार कपडे परिधान करत असतात . आपला बळीराजा हा गाव _ गाड्यात , खेड्या _पाड्यात विरळ लोकवस्तीस  वास्तव्यास असल्याने कोरोनाच्या संसर्गापासून अल्पप्रमाणात लांब असल्याने व स्थानबंदी तसेच टाळेबंदीचा काहीही विपरीत परिणाम आपल्या कर्तुत्वावर तसेच दैनंदिन दिनचर्यावर न होऊ देता आपला व्यवसाय हा अविरत गतिमान ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. बळीराजाला हे ज्ञात होते की कोरोना संक्रमण काळात बरेचसे उद्योग हे मोडकळीस येतील , लोकांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागेल अशा बिकट प्रसंगी शेतमालाच्या भावाची पर्वा न करता , दळणवळणाच्या साधनांची तमा न बाळगता तसेच आज आपण स्वतःजे काही पेरत आहोत त्याचा उपभोग  घेण्यासाठी या जगात राहतो की नाही याचाही पर्वा बाळगता आपल्या व्यवसायात खंड न पडू देता सतत प्रवाहात ठेवला .


इतिहास पाहिला असता जेव्हा _ जेव्हा भारतात आणीबाणी सदृश्य परिस्थिती उभी राहिली आहे, तेव्हा _ तेव्हा बळीराजा खंबीरपणे योगदान देण्यासाठी उभा राहिला आहे. उद्योगासाठी जमीन देणे असो की दळणवळणासाठी रस्त्याचे जाळे विणण्यासाठी , बळीराजाच मदतीला धावून आला आहे .एक साधा विचार आपण जर केला की कोरोना काळात बळीराजा कडून संपूर्ण मानवी समूहासाठी आवश्यक असणारे अन्नधान्य व तत्सम घटक उत्पादित झाली नसती तर काय हाहाकार माजला असता . आधुनिक जीवनशैलीने शेती व्यवसायाला पर्यायाने बळीराजाला , बळीराजाच्या मेहनतीला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते परंतु कोरोना काळात सर्व व्यवसाय बंद असताना फक्त शेती हाच व्यवसाय तग धरून राहू शकला . बळीराजाने आपल्या मेहनतीने आपले योगदान संकट काळात कसे महत्त्वपूर्ण आहे हे पटवून दिले आहे.


 कोरोनाने जगाला अल्प गरजाधारित जीवनशैली जगण्याचे शिकवले मानवाच्या सर्व भौतिक गरजा ह्या दुय्यम आहे तर मानवाच्या स्वतःचा प्राण कसा महत्त्वाचा आहे हेही शिकवले. मानवाने मूलभूत गरजा तसेच जीवनावश्‍यक गरजासाठी प्रयत्नरत रहावे नुसते दिवास्वप्न पाहण्यात मग्न राहू नये हे देखील समजावले. बळीराजाने शहरी भागातील बेरोजगार मानवी समूहास जे रोजंदारी निमित्ताने शहराकडे वास्तव्यास गेले होते ते कोरोना काळात ग्रामीण भागात परत आल्याने त्यांना शेतीकामाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिलाच परंतु भारतीय जनमानसातील जीवनात शेती व्यवसायाचे किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे देखील पटवून दिले. म्हणूनच तर बळीराजाला अन्नदाता म्हटले जाते.




                हेमकांत मोरे.

                    नंदुरबार.

            94 23 91 70 74.

Post a Comment

0 Comments