डोंबिवलीच्या सावली बेघर निवारा केंद्रातील बेघर, वृद्ध व अपंग नागरिकांचे लसीकरण




डोंबिवली  ( शंकर जाधव ) 

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेमार्फत दररोज २१  कोविड लसीकरण केंद्रांवर सुमारे ४५००- ५०००  नागरिकांचे लसीकरण केले जाते.  डोंबिवली पूर्व येथे संगीतावाडी परिसरात दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत गुरुकृपा विकास संस्था यांचेमार्फत चालविल्या जाणा-या सावली बेघर निवारा केंद्रातील"* ३५  बेघर , वृध्द व अपंग व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या दत्तनगर नागरी आरोग्य केंद्रांमार्फत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments