डोंबिवलीतील मतीमंद तरुणीची कोरोनावर मात..

डोंबिवलीतील मतीमंद तरुणीची कोरोनावर मात.. 
  डोंबिवली प्रतिनिधी - शंकर जाधव 
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील कोरोना रुग्णालयात  ३२ वर्षीय मतीमंद तरुणीवर उपचार करण्यात आले.  १०० टक्के कोरोना इन्फेक्शन झालेल्या या तरुणीवर २० दिवस यशस्वी उपचार करण्यात आले तिला शनिवारी  रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. राहुल घुले यांनी पत्रकारांना दिली. काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील एका चार सदस्यीय कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. यातील ३२ वर्षीय तरुणी मतीमंद असल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यास खाजगी डॉक्टरानी नकार दिला होता. एचआरसिटी स्कनमध्ये तिला १०० टक्के इन्फेक्शन झाल्याचे निदान झाल्याने तिला श्वास घेण्यास कमालीचा त्रास होत होता. मात्र तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यास कोणीही तयार नसल्यामुळे कुटुंबाने अखेर सोशल मिडीयावर व्यथा मांडत मदतीची याचना केली होती. हि पोस्ट खासदार डॉ. श्रीकात शिंदे यांनी वाचताच  त्यांनी तातडीने डॉ. घुले यांच्याशी संपर्क साधला. खासदार डॉ. शिंदे यांनी संबधित तरुणीवर उपचार करण्याची विनंती  केली. तसेच संबधित कुटुंबाला सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास सांगितले. मागील २० दिवसापासून या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. रेमेडेसीवरसह इतर आवश्यक त्या सर्व उपचाराला या तरुणीने चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला ड्युटीवरील कर्मचार्यांना या तरुणीकडून कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता होती यामुळेच तिच्या भावाला कोरोना मुक्त झाल्यानंतरहि तिच्याबरोबर रुग्णालयात थांबण्याची परवानगी देण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments