उच्चभ्रु वस्तीतल्या हॉटेलचा आडून वेश्या व्यवसाय सुरु..

 उच्चभ्रु वस्तीतल्या हॉटेलचा आडून वेश्या व्यवसाय सुरु..



प्रतिनिधी: अवधुत सावंत


लॉकडाउनचे ही तारतम्य नाही

  मिरा भाईंदर शहरातील भाजप नगरसेविका मेघना रावलच्या ‘द मायरियाड’ या हॉटेलमध्ये शहरात कडक लॉकडाउन असून देखील वेश्या व्यवसाय चालू होता. पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे. लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली भाजप नागरसेविका मेघना रावल यांच्या मालकीचे असलेले ‘द मायरियाड’ या हॉटेलमध्ये चक्क वेश्या व्यवसाय चालवला जात असून दलाला मार्फत टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या मुलीं तसेच मॉडेलिंग करणाऱ्या मुली याच हॉटेलमध्ये ग्राहकांना पुरविल्या जात असल्याची माहिती मिरा भाईंदर

पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. माहितीची खात्री केल्या नंतर अमित काळे यांच्या पथकाने या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे.


  कोरोना महामारीमुळे लॉकडाउन झाल्यामुळे चित्रपट सृष्टीची कामे बंद पडल्याने या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही दलालांनी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले असून पोट भरण्यासाठी नाईलाजाने या मुलींवर वेश्या व्यवसाय करण्याची पाळी आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी धाड टाकून रामरतन कारवा आणि परबत मानचामरिया या दोन दलालांना अटक केली आहे असे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments