मूळझोपडीधारकांची घरे महादलाल ने गळपाटली

विमल शहा ची पत्नी नातलग व कर्मचारी पात्र (?)
मूळझोपडीधारकांची घरे महादलाल ने गळपाटली
मुंबई दि (प्रतिनिधी) 
आकृती हब टाऊन विकासक एमआयडीसी जच्या माध्यमातून झोपु योजना राबवित असून विकासक विमल शहा यांच्या पत्नीच्या नावे सदनिका पात्र असल्याचे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यंमांना कळवले आहे.*

अंधेरी पूर्वेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्प राबविण्यात  येत असून या प्रकल्पा मध्ये आकृती हब टाऊन विकासक विमल शहा याने खोटी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या, पत्नी, मेहुनी, नातलग व कार्यालयीन कर्मचारी यांचे नावे जवळपास 50 च्या वर सदनिका पात्र करून घेतल्याचे पुरावे डॉ माकणीकर यांच्याकडे असल्याचा  दावा त्यांनी केला आहे.

विकासक विमल शहा, महादलाल मुरजी पटेल आणि आणि तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने करारनाम्यातील तरतुदीनुसार (पान क्र. ३०, कलम ४.१ ) विकासक विमल शहाने सर्वेक्षण करून झोपडी धारकांच्या कागदपत्रांवरून मूळ परिशिष्ट तयार करून एमआयडीसी प्रशासनास सादर केले व त्या पत्रानुसार एमआयडीसी ने पत्र क्र. ३९१ दि १०/०२/१९९९ रोजी परिशिष्ट क्र. २ यास मंजुरी पारित केली. 

मात्र: विकासकाने सर्व बोगस पात्र झोपडीधारकांची कागदपत्र अद्यापही एमआयडीसी प्रशासनास सादर केली नसून ही फसवणूक झाली असून तात्काळ विमल शहा, मुरजी पटेल व तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments