घातपात की अपघात, पोलीस यंत्रणेकडून कसून तपास सुरू



    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे भेर्दवाडी येथे एका अज्ञात इसमाचे जळालेल्या अवस्थेत प्रेत 27 एप्रिल 2021 रोजी आढळून आले आहे. 


    सविस्तर माहिती अशी की,शेताच्या बांधाला रचून ठेवलेल्या कवळांच्या चाकीमध्ये अज्ञात व्यक्तीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून तो मृत देह जास्त प्रमाणात जळाल्याने त्याची ओळख पटवणे अशक्य झाले आहे. मृत देह हा साधारण 55 ते 60 वयोगटातील असावा असे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपविभागिय पोलिस अधिकारी श्री.नितीन कटेकर ,पोलिस निरिक्षक श्री.अजमुद्दीन मुल्ला.पोलिस उपनिरिक्षक श्री.अनमोल रावराणे. त्यांचे पथक नरडवे येथे घटनास्थळी रवाना झाले होते, सोबत नरडवे गावचे पोलीस पाटील संदेश साटम हेही त्या घटनास्थळी उपस्थित होते.  तेथील वस्तूस्थितीचा स्पॉट पंचनामा करण्यात आला असून सदर घटना ही घातपात असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे

        आमच्या लोकसत्यवाणी वृत्त वाहिनीचे संपादक संतोष सावंत  यांनी या सदर घटनेचो माहिती नरडवे पोलिस पाटील संदेश साटम यांच्याशी फोनद्वारे माहिती घेतली.

Post a Comment

0 Comments