प्रतिनिधी: अवधुत सावंत
नवी मुंबई येथे रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार करून विकणाऱ्या ३ जणांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, एक इसम रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असून तो एक रेमडेसिवीर इंजेक्शन २० हजार रुपयांना विकत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती.
सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून सदर इसमास कोपरखैरणे, सेक्टर १५, नवी मुंबई येथे ४ रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करत असताना रंगेहात पकडले.
सदर प्रकरणी त्याच्याकडून ४ रेमडेसिवीर इंजेक्शन, १ मोटार सायकल, १ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ६८,५००/- किंमतीचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सदर गुन्ह्यात आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.


0 Comments