आज-काल सगळीकडे एकच चर्चा कोरोना कोरोनाने गरिबापासून तर श्रीमंता पर्यंत सगळ्यांना च हैराण करून सोडले आहे आपल्या मधलं कोण कधी सोडून जाईल याचा क्षणाचा भरोसा राहिलेला नाही
कोरोना मधी सगळ्यात जास्त हातावरचे व गोरगरीब सामान्य माणसाचे हाल होत आहे परिस्थितीमुळे सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे मागच्या कोरोना काळात सामान्य माणसाचे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे घासली गेली ती सुधारत नाही तर परत एकदा कोरोनाने पुन्हा वर डोके काढले आता गोरगरीब जनतेपुढे दोन वेळच्या भाकरीची पंचाईत झाली आहे
आणि या कोरोना काळात सामान्य माणसाला कोरोना झाला तर पैसे आणायचे कुठून हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य माणसापुढे उभा राहतो अशावेळी कुणीही मदतीला पुढे येत नाही तुम्ही ज्यांना भाऊ दादा करता ते यावेळी नॉटरिचेबल असतात बरोबर ना पैसे आज नाही तर उद्या कमवता येते पण माणूस गेलेला परत कसा कमवायचा
तुम्ही ज्यांना भाऊ दादा काका करता त्यांना विनंती करा ती निवडणुकीच्या वेळेस तर मोठी हॉटेल बुक करून ठेवता मग आत्ता कोरूना काळात मोठी मोठी कोरोना सेंटर उभारा तेव्हा तुम्हाला भाऊ दादा काका केल्याच सार्थक होईल
पण नाही काही महाभाग कोरोना काळात पैसे कमविण्याच्या मागे लागले आहे कोरोणा सेंटर उभारतात आणि व्हाट्सअप वर सोशल मीडियावर जाहिरात करतात सामान्य माणसासाठी कमी किमतीत कोरोना सेंटर या फक्त म्हणायच्या गोष्टी आहे एकदा सामान्य माणूस तिथे गेला की यांना जे करायचे तेच करतात
मी अक्षय करपे माझ्या टाकळीमिया पत्रकार संघाच्या वतीने एवढी विनंती करतो की दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कोरोना सेंटर उभारावीत पैसे आज नाही उद्या कमावता येतील पण गोरगरिबांचे गेले संसार पुन्हा कधीच उभारता येणार नाही

0 Comments