गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे.
दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.


0 Comments