कातळवाडीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपलं ; गणपत गुणाजी तांबे यांचं दुःखद निधन !
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र गणपत गुणाजी तांबे ( ७४ ) यांची नुकतीच आज शनिवार दि.०३ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ०६ :०० वा सुमारास गावी राहत्या घरी प्राणज्योत मावळली.कातळवाडी गावचे हे एक अनेकांच्या हृदयातील व्यक्तिमत्त्व होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या या बाबांनी आपली अनेक वर्षे सामाजिक कार्यास अर्पण केली.गावचं ग्रामीण-मुंबई मंडळात सक्रिय राहून,श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळाचे संस्थापक/ग्रुप ग्रामपंचायत मुर्तवडे,वारेली, कातळवाडी अंतर्गत पाणी कमिटी कातळवाडी माजी अध्यक्ष/तसेच शाळा व्यवस्थापन कमिटीत नेहमीच पुढाकार घेऊन अनेक पद भूषवणारे हे बाबा आज स्वर्गीय झाले.
उद्या - रविवार दि.०४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० : ०० वा. गणपत गुणाजी तांबे बाबांवर अंतिम संस्कार होतील
त्यांची गावच्या प्रत्येक उपक्रमातील तळमळ,त्यांचे कार्य हे निश्चितच प्रेरणा देऊन जाते. आज सणासुदीच्या दिवसांत अचानकपणे तुम्ही आमच्यातून जरी शरीराने निघून गेलात तरी तुमची कार्यरूपी आठवण कायमच स्मरणात राहील.
असे समस्त कातळवाडी ग्रामीण-मुंबई मंडळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत
भावपूर्ण श्रद्धांजली


0 Comments