"काव्यातील नक्षञ "या ई मासिकाचे प्रकाशन लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड मानकरी श्री रामदास माने यांच्या शुभहस्ते संपन्न-

  "काव्यातील नक्षञ "या ई मासिकाचे प्रकाशन लिम्का बुक आॅफ रेकाॅर्ड मानकरी श्री रामदास माने यांच्या शुभहस्ते संपन्न-



        विषुवदिन व चिमणी दिवस आणि महाड चवदार तळे स्मृतीदिना निमित्त  "काव्यातील नक्षञ" ई मासिकाच्या अकराव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न चिंचड,पुणे येथे संपन्न झाला.

         या प्रकाशन सोहळा प्रसंगी उद्योजक श्री रामदास माने म्हणाले कि,"कवींच्या हक्काचे...सन्मानाचे ,आदराचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.२१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम त्यांनी संपन्न केले.समाजातील विविध स्तरातील माणसांना जोडणारे व्यासपीठ आहे.या व्यासपीठाने समाजात प्रबोधन करण्याचे काम करत आहे.अनेक कविंना या ई मासिकातुन स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे.या मंचाचा विस्तार सर्वञ होवो.समाजाची संवेदनशिलता जपत ,जनजागृतीचे कार्य करत आहे.कवितेची पंरपरा हजारों वर्षाची आहे.ती काव्यमंच जपण्याचा प्रयत्न करत आहे.रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी,गाथा,ग्रामगीता हे सर्व काव्यच आहे.त्यातुन समाजाची जागृती केलेली आहे.कवी हे राष्टाचे प्राण आहे.त्यांना समाजाने जपले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छा अभियानातुन समाजाची सेवा करण्याची मला संधी मिळाली आहे.अल्पखर्चात टाॅयलेट निर्माण करण्याचा मान आम्ही मिळविला आहे.ज्या मुलींच्या घरी लग्न झाल्यावर जर टाॅयलेट नसेल तर माने ग्रुप आॅफ कंपनीच्या वतीने मोफत टाॅयलेट आहेर देण्यात येतो.आता पर्यंत आमच्या कंपनीच्या माध्यामातुन ५५ हजार टाॅयलेट समाजाला दिली आहे.काव्यमंचचे कार्य असेच वाढत राहो.ही शुभेच्छा देतो."


यावेळी उद्योजक,काव्यप्रेमी,मा.श्री.रामदास माने साहेब (चेअरमन-माने ग्रुप आॅफ कंपनी,भोसरी,पुणे)(मार्गदर्शक-व आधारस्तंभ -नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे)प्रकाशन सोहळा विशेष अतिथी  म्हणुन उपस्थित होते.शिक्षणतज्ञ,इंटरनॅशनल करिअर कौन्सलर मा.श्री.योगेश बहाती (नाशिक जिल्हाअध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच)प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे  मा.कविवर्य पिराजी पाटील(कर्नाटक राज्य अध्यक्ष -नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्या सौ जया बोरकर-कट्टर नक्षञ(काटोल तालुका विभागप्रमुख- नक्षञाचं देणं काव्यमंच)मा.कविवर्य जितेंद्र रायपुरे-कट्टर नक्षञ-( गडचिरोली जिल्हाअध्यक्ष -नक्षञाचं देणं काव्यमंच)मा.कविवर्या सौ.छाया ब्रम्हवंशी(कट्टर नक्षञ-गोंदिया-  नक्षञाचं देणं काव्यमंच)प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणुन आॅनलाईन उपस्थित होते. मा.कविवर्य श्री शाहू संभाजी भारती संपादक -डिजीटल शैक्षणिक दैनिक-रयतेचा वाली व उपसंपादक-काव्यातील नक्षञ)मा.कविवर्य अनंत बावणे-कट्टर नक्षञ(घाटंजी तालुका विभाग प्रमुख- नक्षञाचं देणं काव्यमंच)मा.कविवर्या शितल कांडलकर -कट्टर नक्षञ( नागपूर- नक्षञाचं देणं काव्यमंच)  मा.कविवर्य डाॅ.रवींद्र मोरे-कट्टर नक्षञ( जळगाव --नक्षञाचं देणं काव्यमंच)  कविवर्य संपत वैराळ-कट्टर नक्षञ (  पालघर,नक्षञाचं देणं काव्यमंच) व सौ.शोभा माने,चि.साईराजे सोनवणे इ.नी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.  

     प्रकाशन  विषुवदिन व चिमणी दिवस आणि चवदार तळे महाड सत्यागृह दिनानिमित्तहा सोहळा  संपन्न  झाला.  या उपक्रमाचेसंयोजक-संपादककवी -वादळकार,पुणे व  नक्षञाचं देणं काव्यमंच व नक्षञ परिवार यांनी केले होते..

Post a Comment

0 Comments