गुरुवर्य जाधव सरांवर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव


 गुरुवर्य जाधव सरांवर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव



 कणकवली (प्रतिनिधी): आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त नरडवे हायस्कुल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रुपाजी जाधव यांच्यावर 76 व्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छांचा वर्षाव झाला. जाधव सरांचे विद्यार्थी असलेल्या सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ.सतीश पवार यांनी जाधव सरांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नरडवे हायस्कुल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रुपाजी सोमा जाधव यांनी आपल्या सेवाकाळात आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची रुची निर्माण केली. कठीण वाटणारा इंग्रजी विषयही जाधव सरांच्या सहजसोप्या शिकवण्याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आवडीचा वाटू लागत असे. जाधव सरांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज देश विदेशात आपापल्या क्षेत्रात नाव कमवून आहेत. शिक्षक म्हणून काम करत असतानाच जाधव सरांनी सिंधुदुर्ग माध्यमिक अध्यापक संघ, कणकवली माध्यमिक अध्यापक संघ, कणकवली माध्यमिक मुख्याध्यापक संघ, बौद्ध हितवर्धक मंडळ सावंतवाडी, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था आदी सामजिक संघटनांमध्ये हिरीरीने काम केले. माध्यमिक शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी प्रशासनाशी विधायक मार्गाने लढा दिला. जाधव सरांच्या आजच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संस्था, माजी विद्यार्थ्यानी मोबाईल, व्हाट्सअप मेसेजद्वारे अभिष्टचिंतन केले.

Post a Comment

0 Comments